सीसीडी काय, बरिस्टा काय किंवा सब वे काय... प्रेमीजनांची हक्काची जागा. मक्का, मदिना, काशीच झालेत हे स्पॉट्स! कॉफी निव्वळ निमित्तमात्र. कॉफी टेबलाच्या अवतीभवती इथे खूप काही घडत असतं.
A lot can happen over coffee...
'कॅफे कॉफी डे'ची ही पंचलाइन पहिल्यांदा वाचली तेव्हा ही काय नवीन भानगड, असं वाटायचं. कॉफीच तर प्यायचीय... मग आपलं नाक्यावरचं उडप्याचं हॉटेल आहे ना? त्यासाठी ही हायफण्डा कॉफीशॉप्स कशाला..?
पण जावे त्याच्या वंशा... हेच खरं!
ही दुनिया आपली नाही, हे कल्चर आपलं नाही, तिथलं जगही आपलं नाही... हे म्हणणं अगदी १०० टक्के मान्य. तरीही एकदा तिथे पाय ठेवला की, त्या दुनियेच्या प्रेमात आपण पडल्याशिवाय राहत नाही. निदान प्रेमात बुडालेली लव्हर्स कम्युनिटी तरी..! सीसीडी काय, बरिस्टा काय किंवा सब वे काय... प्रेमीजनांची मक्का, मदिना, काशीच झालेत हे स्पॉटस्. इथे कॉफी निव्वळ निमित्तमात्र आहे. कॉफी टेबलाच्या अवतीभवती खूप काही घडत असतं.
शीशमहालासारखी दिसणारी ती कॉफीशॉप्स. काचेच्या पारदर्शी खिडक्या आणि दारं. निळ्या गुलाबी रंगाचे साइन बोर्ड. व्हरांड्यात मस्तपैकी सजवलेली गुलाबी कपड्यातली टेबलं. टेबलांवरचं हायफाय पब्लिक. लो वेस्ट जीन्स आणि मेसेजवाले टी शर्टस् घालणारी टकाटक पोरंपोरी... फाडफाड इंग्लिश फाडत त्यांना सर्व्हिस देणारे झकपक कपड्यातले वेटर... कालपर्यंत स्टार मुव्हीज किंवा एचबीओ चॅनेलच्या हॉलिवूडपटांमध्ये पाहिलेले हे सीन आता रिअॅलिटीमध्ये उतरले आहेत. आपल्या घराच्या आजूबाजूला लोअर परळ, वरळी आणि प्रभादेवीच्या मराठमोळ्या वस्तीतल्या नाक्यापर्यंत हे सीसीडी, बरिस्टा आणि सब वेचं लोण पसरलंय. पंजाबी ड्रेसमधल्या पोरीही इथल्या टेबलांवर दिसू लागल्या तेव्हा मराठी पाऊल दबकत का होईना, पुढे पडत असल्याची खात्री पटली.
एरव्ही हॉटेलात दहा-वीस रुपयांना मिळणा-या कॉफीसाठी इथे शंभराची नोटही कमी पडते. पण त्या शंभर रुपयांच्या बदल्यात जे काही पदरात पडतं, त्याला खरंच मोल नाही. निदान पैशात तरी ते मोजता येणार नाही.
सकाळ-संध्याकाळ ही कॉफीशॉप्स गर्दीने ओसंडलेली असतात. दुपारी जरा ओहोटी असते. त्यामुळे प्रेमी कपल्ससाठी ही वेळ मस्तच. आत फक्त तीन-चार कपल्स. कोप-याची टेबलं पकडून बसलेली. एक कपल छानपैकी सोफ्यावर विसावलेलं. टेबलावर कॉफीचा एखादा ग्लास... सोबत कुकीजचं पॅकेट. कुणी छोटासा केकही ऑर्डर केलेला. तो तिला आपल्या हातांनी केकचा तुकडा भरवतोय आणि ती हलकेच त्याच्या बोटाचा चावा घेत केकचाही बाइट घेतेय... त्याने पटकन चावलेलं बोटं स्वत:च्या तोंडात घातलेलं. मग ती एकदम खळखळून हसायला लागलेली.
इथे एक बरं असतं. दुस-या टेबलवर काय चाललंय, याच्याशी बाकीच्यांना काहीच कर्तव्य नसतं. एखाद्या कपलकडे बाकीचे पाहताहेत, असला गावठीपणा कॉफीशॉप्सच्या सो कॉल्ड कल्चरमध्ये शोभत नाही. अलिखित नियम म्हणा किंवा एथिक्स. पब्लिक प्लेसमध्ये प्रायव्हसीचा स्वर्ग, हेच तर या कॉफीशॉप्सचं महत्त्वाचं वैशिष्ट्यं. इथे तुम्ही एक कॉफी ऑर्डर केली आणि दोन-अडीच तास बसलात तरी कुणीही हटकत नाही. हॉटेलसारखा डोक्यावरचा पंखाही बंद होत नाही. मुळात पंखाच नसतो, सारं कसं एअर कंडिशण्ड... ठंडा ठंडा कूल कूल... पण हे कूल वातावरण कधी कधी फारच हॉट होतं. म्हणजे कोपऱ्यातल्या टेबलावर कॉफीचा आस्वाद घेत 'कुची कुची' करणारं कपल अचानक सोफ्यावर येऊन विसावतं. बहुतेक कॉफीचा कैफ त्यांच्यावर चढलेला असतो. तो तिला अलगद ओढून घेतो आणि मोठ्ठासा किस घेतो. या कल्चरमध्ये त्याला स्मूचिंग म्हणतात... हे सगळं बिनदिक्कतपणे सुरू असतं. कुणी सोफ्यावर, कुणी बिन बॅग्जवर... जणू शेजारी कुणी नाहीच, अशा थाटात त्यांचे राऊण्ड्स रंगतात. सोफ्यावरची ही रासलीला कुणाच्या गावीही नसते. तिथल्या वेटर्सच्याही... त्यांची समाधीवस्था भंग न करताच ते निमूटपणे ऑर्डर टेबलावर ठेवतात आणि निघून जातात. दुपारी एक ते संध्याकाळी पाच-साडेपाच ही वेळ म्हणजे अशा प्रेमात बुडालेल्या कपल्ससाठीचे हॅप्पी अवर्सच..!
लालसर मंद प्रकाश, कानावर पडणारं पाश्चात्य संगीत, कधीमधी टीव्हीवर सुरू असलेला रॉक शो... या वातावरणात आणखी वेगळे रंग भरत असतात. कॉलेजमध्ये लेक्चर बंक करून आलेल्या पोरापोरींचं खिदळणं एकीकडे... कुणी गेल्या वर्षी याच ठिकाणी आपल्या प्रेयसीला पहिल्यांदा प्रपोज केलं म्हणून, प्रपोजल अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणारं... कुणाचा तरी बर्थ डे... कुणी आपल्या ऑफिस कलीगला घेऊनआलेलं... तर कुणी पहिल्यांदाच डेटसाठी मैत्रिणीसोबत आलेलं... वाफाळलेल्या कॉफीचे घुटके घेत लॅपटॉपवर कसलीशी आकडेमोड करत बसलेला एखादा एकटा जीवही याच गदीर्त... पण एका टेबलचं दुस-या टेबलशी काहीही नातं नसतं. प्रत्येक टेबलची निराळी स्टोरी.
A lot can happen over coffee! खरोखरच...
- सुनील घुमे
Monday, November 30, 2009
Thursday, November 12, 2009
गल्लीत घाला गोंधळ
परळचं सेंट्रल रेल्वेचं मैदान... तिथून स्टेशनच्या दिशेने जाणारी चिंचोळी, अंधेरी गल्ली... ब-यापैकी व्हर्जिन म्हणावा असा, हा लव्हर्स स्पॉट. डोळे मिटून दूध पिणा-या, वॉकी-टॉकीवाल्या प्रेमी कपल्ससाठी ही जागा सोयीची....
ऋतुजा आणि संदिप... एकाच बिल्डिंगमध्ये, पण दोन धुव्रांवर राहणारे दोन जीव. ऋतुजा म्हणजे लाजाळूचं झाड. कॉलेज, क्लास, घर. एवढंच तिचं विश्व. त्याच्या नेमका उलट आपला सँडी. बोल्ड अॅन्ड बिनधास्त... ते म्हणतात ना की, दोन विजातीय धुव्रांमध्ये एकमेकांबद्दल आकर्षण असतं. या दोघांचीही केस सेम होती. संदिपला ऋतुजा आवडत होती... पण प्यार का इजहार करणार तरी कुठं, हा प्रश्न होता. बाहेर कुठं बोलवावं, तर ऋतुजा येणार नाही, एवढं नक्की. एखाद्या मित्र-मैत्रिणीला कबुतर बनवायचाही चान्स नव्हता.
शेवटी संदिपनेच एका संध्याकाळी तिला रस्त्यात गाठलं. परळच्या मेन रोडवर. क्लासला जाताना. जरा तुझ्याशी बोलायचंय... पाच मिनिटं. खूप महत्त्वाचं आहे... त्याने सुरूवात केली. संदिप काय विचारणार, हे तिला अचूक उमजलं. पण रस्त्यात असं बोलणं तिला योग्य वाटत नव्हतं. ओळखीचं कुणीतरी पाहिल, अशी भीती तिला वाटत होती. तिची धाकधूक वाढू लागली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येऊन त्यानं तिला आपल्या मागून चालायला सांगितलं. एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून ते चालत होते. संदिपने अचानक मेन रोडवरून सेंट्रल रेल्वेच्या मैदानामध्ये लेफ्ट टर्न घेतला. तीही दबकत अडखळत वामांगी वळली....
परळच्या मेन रोडवरचं सेंट्रल रेल्वेचं हे मैदान. सेंट्रल रेल्वेचा कारखाना आहे तिथं. रेल्वे अधिका-यांची कॉलनीही आहे. एका बाजूला भलंमोठ्ठं मैदान, समोरच्या बाजूला कारखाना आणि उजवीकडे कॉलनी. मेन रोडवरून आत वळलं की, एक रस्ता मैदानाकडे जातो आणि दुसरा रस्ता थेट परळ रेल्वे स्टेशनपर्यंत... खरं तर गल्लीच म्हणता येईल अशी ही जागा. अगदी दिवसाउजेडीही या रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. रेल्वे कामगार सकाळी येतात तेव्हा आणि संध्याकाळी सुटतात, तेव्हाच इथं काय ती गर्दी असते. एरव्ही दिवसभर शुकशुकाट. संध्याकाळी सूर्य मावळला की, या गल्लीत अंधाराचेच राज्य असते. स्ट्रीट लाइटचा उजेड सोडला तर ही गल्ली अंधेरीच असते. मैदानातही काही वेगळी परिस्थिती नाही. दिवसाउजेडी क्रिकेट वा फुटबॉलच्या निमित्ताने इथं पोरं दिसतात. परीक्षेच्या दिवसात मैदानाच्या कोप-यातील सिमेंटच्या बेंचवर बसून अभ्यास करणा-या पोरांची दाटीवाटी असते. मात्र एकदा का सूर्य मावळला की, या भल्यामोठ्या मैदानात फारसं कुणी फिरकत नाही. काळोख एवढा की, शेजारच्या व्यक्तीचा चेहराही स्पष्ट दिसू शकणार नाही.
ही सर्व वैशिष्ट्यं ऋतुजा आणि संदिपसारख्या प्रेमी कपल्ससाठी अॅडव्हान्टेज ठरतात. त्यामुळे ज्या बेंचवर दिवसा मॅच पाहण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी पोरं जमतात, त्याच बेंचवर रात्री प्रितीची रातराणी फुलते. तुटक्या फुटक्या बेंचचा उंचावरचा कोपरा पकडायचा. सर्वात उंच बेंचवर बसलं की आपल्यामागे पाहणारं कुणी नसतं, शिवाय कोण येतंय, कोण जातंय याच्यावर वरून लक्ष ठेवता येतं. (त्यानुसार पोझिशन घेता येते...) कधी कधी बेंचवरच्या मोक्याच्या जागा आधीच फुल्ल झालेल्या असतात. मग मोर्चा मोकळ्या मैदानाकडे वळतो. लाल मातीत, खुरटलेल्या गवतावरच बैठक मारायची... काही मिनिटांनी ती अलगद आपली मान खांद्यावर टाकते. चांगला मूड असेल तर मैदानातच पडायचं. मोकळ्या आकाशातल्या चांदण्या मोजत...
पण ही झाली सेकंडरी स्टेज... प्रायमरी स्टेजमध्ये बसून गुजगोष्टी करण्यापेक्षा बहुतेक कपल्सचा भर वॉकी-टॉकीवरच असतो. म्हणजे चालता चालता भरपूर काही बोलायचं असतं. अशावेळी सेंट्रल रेल्वे हॉलवरून परळ रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारा चिंचोळा रस्ता एकदम बेस्ट. एक तर अंधारी गल्ली, त्यात प्रत्येक दोन मिनिटानंतर नागमोडी वळण. अधुनमधून माणसांची ये-जा सुरूच असते. त्यामुळे निर्जन रस्ता म्हणून काही धोका होण्याचीही शक्यता नाही. जेमतेम दहा मिनिटांत पार करता येईल, एवढीच ही गल्ली असेल. पण इथं दोन ते तीन तास सहज एन्जॉय करता येतात. म्हणजे कसं की, परळ स्टेशनपर्यंत जायचंच नाही मुळी. त्याच्या आधी जी सेंट्रल रेल्वे शाळा लागते तिथून पुन्हा मागे कलटी मारायची. पुन्हा हॉलच्या दिशेने चालायचं, पण हॉलपर्यंत जायचंच नाही. त्याच्या थोडं आधीच पुन्हा घूम जाव... परळ स्टेशनच्या दिशेने. या परेडमध्ये नुसत्या रोमँटिक गप्पा होत नाहीत, रोमँटिक एक्सरसाइजही होतो...
या अशा रोमँटिक गल्ल्या सगळ्याच एरियात असतात. गरज असते ती फक्त आपल्यातल्या कोलंबसला जागं करायची. आणि एकदा का प्रेमात पडलात की तो कोलंबस आपोआप जागा होतो. म्हणतात ना की, गरज ही शोधाची जननी असते! लागा तर मग शोधकार्याला...

Labels:
परळ सेंट्रल रेल्वे मैदान,
लव्हर्स स्पॉट,
सुनील घुमे
Sunday, November 8, 2009
रस्ते प्यार के...
डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाटेला तरुणाईची जत्रा भरते. पहिल्या आंघोळीला नटूनथटून अख्खा यंगिस्तान फडके रोड वर अवतरलेला असतो. इथं मैत्रीचे बंध वृद्धिंगत होतात, प्रेमाचे अंकुर फुलू लागतात.
काय पक्या, वोट बिट डाला की नही..?
म्हणजे काय... एकदम दिलसे!
दे टाळी. आपणबी दिलसे. ग्रुपमधल्या सगळ्यांनी ठरवून केलं वोटिंग.
ग्रुप? म्हणजे आपली कॉलेजची गँग?
मग...
अरे, एक विचारू. ती ढवळेंची सारिका... येते का रे अजून ग्रुपमध्ये?
टिंग टिंग टिडिंग... एक काम कर, दिवाळीला फडके रोडवर भेट. तुला उत्तरही सापडेल आणि सारिकाही...
सीएसटीच्या दिशेने धावणाऱ्या डोबिंवली स्लो लोकलमध्ये, कॉलेजमधले दोन मित्र ब-याच दिवसांनी भेटले होते. त्यांच्या गप्पांची गाडी अर्थातच फडके रोडवरची दिवाळी पहाट या स्टेशनावरच रेंगाळत होती.
डोंबिवलीचा फडके रोड... गेली कित्येक वर्षं दिवाळी पहाटेला या रोडवर तरुणाईची जत्रा भरते. पहिल्या आंघोळीला अभ्यंग स्नान वगैरे करून, झकपक कपडे घालून, नटूनथटून यंग पोरंपोरी इथे जमतात. चौदा-पंधरा वर्षांपासून तिशी-पस्तिशीपर्यंतचा यंगिस्तान फडके रोडवर अवतरलेला असतो, उत्स्फूर्तपणे! कोणाचंही बोलावणं आलेलं नसताना... गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलीय. एरव्ही कॉलेजचं लेक्चर बंक करतील, नाहीतर ऑफिसला बुट्टी मारतील. पण दिवाळी पहाटेच्या दिवशी फडकेवर जायचा नेम यंग ब्रिगेड काही केल्या मोडत नाही. फक्त डोंबिवलीच नव्हे तर कल्याण, उल्हासनगर, बदलापूरपासून तरुण पोरापोरींचे गुप्स या रोड शोमध्ये सामील होतात. एकदम ढिनचॅक माहोल असतो इथला. फ्रेण्ड्सनी एकत्र जमून धम्माल मस्ती करायची, हा त्यादिवसाचा एकमात्र अजेंडा. कुणी ग्रुपसोबत आलेलं, तर कुणी जुन्या ग्रुपच्या शोधात आलेलं. शाळा-कॉलेजनंतर एखाद्या मित्रमैत्रिणीचा कॉण्टॅक्ट तुटला असेल, तर इथे लिंक सापडतात. शंभर टक्के! ओळखीचा कुणीतरी भेटतो, नंबर देतो, इमेल देतो... नशीबवान असाल तर ती व्यक्तीच दत्त म्हणून तुमच्या समोर साक्षात हजर असते. 'दिल ने पुकारा और वो चले आए...'
शेरवानी, झब्बा, सदरालेंगा असा मुलांचा ड्रेस कोड, तर पोरी मस्तपैकी साड्या नेसून, अंगावर दागदागिने घालून, नखशिखांत नटूनथटून आलेल्या. कालपर्यंत कॉलेजच्या कट्ट्यावर जीन्समध्ये रफ टफ दिसणारी ती... साडीमध्ये तिचा लूक एकदम चेंज झालेला असतो. आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. आयला, साडीत काय सही दिसतेस... सेम 'मै हूँ ना'मधली सुश्मिता... एवढ्या कौतुकाने तिच्या गालावर लाली चढते. आपलीही दिल की धडकन सबसे तेज झालेली असते. कानात घंटा घणघणू लागतात. विचारू की नको, विचारू की नको... शेवटी मोठ्ठा श्वास घेऊन एकदाचा तो प्रपोज करतो... 'आय लव्ह यू, माधवी...' दोन क्षण वातावरण टेन्स होऊन जातं. टी-२० मॅचसारखं. लास्ट बॉलवर दोन रन्स हव्यात आणि शेवटची विकेट बाकी असावी तसं... दोन्ही हात तोंडावर घेऊन ती चेहरा झाकून घेते... लाजून चूर. टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडतो. ग्रुपमधले फ्रेण्ड्स कॉन्ग्रॅट्स देतात. दोघांचं ऑन द स्पॉट जमतं. दिवाळीचा फर्स्ट डे, फर्स्ट हो...
एवढं सगळं झाल्यावर सेलिब्रेशनही व्हायलाच हवं. संस्कार भारतीवाल्यांनी काढलेल्या रांगोळ्यांतून आणि फडके रोडवरच्या गदीर्तून वाट काढत सगळा ग्रुप अंबिकामध्ये नाहीतर मॉडर्न कॅफेमध्ये पोहोचतो. खावो, पिवोसाठी... तर आत घुसायलाही जागा नसते. सगळी टेबल्स हाऊसफुल्ल. आप कतार में है, कृपया प्रतिक्षा किजीए... अर्धा-पाऊण तास वेट केल्यानंतर नंबर लागतो. ऑर्डर येईपर्यंत वेळ लागणार असतो. पण इथे घाई आहे कुणाला? एकमेकांची खेचत, नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देत धम्मालमस्ती सुरू असते. फडके रोडवरच्या सगळ्याच हॉटेलमध्ये हाच मूड असतो. जागा मिळाली नाही, तर थेट एमआयडीसीपर्यंत वारी करावी लागते. दुपारी अकरा-बारापर्यंत ही दिवाळी पहाट अशीच रंगत जाते. ऊन्हं वाढू लागली की, मग पांगापांग सुरू होते.
सोशल नेटवर्किंगवाल्यांनाही तोंडात बोटं घालायला लावेल, अशी फडके रोडवरची ही दिवाळी पहाट. विदेशी व्हॅलण्टाइन डेच्या पठडीतला हा मराठमोळा कल्चरल पर्याय. मैत्रीचे बंध आणखी दृढ व्हावेत, वृद्धिंगत व्हावेत, हा या परंपरेमागचा कॉमन मिनियम प्रोग्राम. फडके रोडवरच्या गणपतीबाप्पाच्या साक्षीने फुललेली ही मराठमोळी डेटिंगची परंपरा आता ठाणे-मुंबईच्या अन्य भागातही विस्तारायला लागलीय. ठाण्याचा राम मारुती रोड, तलावपाळी, विलेपार्ल्यातील पालेर्श्वर मंदिर, गिरगावातील फडके गणपती मंदिर या स्पॉट्सवरही अलिकडच्या काळात तरुणााईचा हा ऊरूस भरू लागलाय.
आमची कुठेही शाखा नाही, हे मराठी माणसाचं आवडतं ब्रीदवाक्य. पण आता दरवर्षी दिवाळी पहाटेच्या शुभ मुहूर्तावर फडके रोडचा शाखाविस्तार डोंबिवली फास्टच्या वेगाने सुरूच आहे.

Subscribe to:
Posts (Atom)