सीसीडी काय, बरिस्टा काय किंवा सब वे काय... प्रेमीजनांची हक्काची जागा. मक्का, मदिना, काशीच झालेत हे स्पॉट्स! कॉफी निव्वळ निमित्तमात्र. कॉफी टेबलाच्या अवतीभवती इथे खूप काही घडत असतं.
A lot can happen over coffee...
'कॅफे कॉफी डे'ची ही पंचलाइन पहिल्यांदा वाचली तेव्हा ही काय नवीन भानगड, असं वाटायचं. कॉफीच तर प्यायचीय... मग आपलं नाक्यावरचं उडप्याचं हॉटेल आहे ना? त्यासाठी ही हायफण्डा कॉफीशॉप्स कशाला..?
पण जावे त्याच्या वंशा... हेच खरं!
ही दुनिया आपली नाही, हे कल्चर आपलं नाही, तिथलं जगही आपलं नाही... हे म्हणणं अगदी १०० टक्के मान्य. तरीही एकदा तिथे पाय ठेवला की, त्या दुनियेच्या प्रेमात आपण पडल्याशिवाय राहत नाही. निदान प्रेमात बुडालेली लव्हर्स कम्युनिटी तरी..! सीसीडी काय, बरिस्टा काय किंवा सब वे काय... प्रेमीजनांची मक्का, मदिना, काशीच झालेत हे स्पॉटस्. इथे कॉफी निव्वळ निमित्तमात्र आहे. कॉफी टेबलाच्या अवतीभवती खूप काही घडत असतं.
शीशमहालासारखी दिसणारी ती कॉफीशॉप्स. काचेच्या पारदर्शी खिडक्या आणि दारं. निळ्या गुलाबी रंगाचे साइन बोर्ड. व्हरांड्यात मस्तपैकी सजवलेली गुलाबी कपड्यातली टेबलं. टेबलांवरचं हायफाय पब्लिक. लो वेस्ट जीन्स आणि मेसेजवाले टी शर्टस् घालणारी टकाटक पोरंपोरी... फाडफाड इंग्लिश फाडत त्यांना सर्व्हिस देणारे झकपक कपड्यातले वेटर... कालपर्यंत स्टार मुव्हीज किंवा एचबीओ चॅनेलच्या हॉलिवूडपटांमध्ये पाहिलेले हे सीन आता रिअॅलिटीमध्ये उतरले आहेत. आपल्या घराच्या आजूबाजूला लोअर परळ, वरळी आणि प्रभादेवीच्या मराठमोळ्या वस्तीतल्या नाक्यापर्यंत हे सीसीडी, बरिस्टा आणि सब वेचं लोण पसरलंय. पंजाबी ड्रेसमधल्या पोरीही इथल्या टेबलांवर दिसू लागल्या तेव्हा मराठी पाऊल दबकत का होईना, पुढे पडत असल्याची खात्री पटली.
एरव्ही हॉटेलात दहा-वीस रुपयांना मिळणा-या कॉफीसाठी इथे शंभराची नोटही कमी पडते. पण त्या शंभर रुपयांच्या बदल्यात जे काही पदरात पडतं, त्याला खरंच मोल नाही. निदान पैशात तरी ते मोजता येणार नाही.
सकाळ-संध्याकाळ ही कॉफीशॉप्स गर्दीने ओसंडलेली असतात. दुपारी जरा ओहोटी असते. त्यामुळे प्रेमी कपल्ससाठी ही वेळ मस्तच. आत फक्त तीन-चार कपल्स. कोप-याची टेबलं पकडून बसलेली. एक कपल छानपैकी सोफ्यावर विसावलेलं. टेबलावर कॉफीचा एखादा ग्लास... सोबत कुकीजचं पॅकेट. कुणी छोटासा केकही ऑर्डर केलेला. तो तिला आपल्या हातांनी केकचा तुकडा भरवतोय आणि ती हलकेच त्याच्या बोटाचा चावा घेत केकचाही बाइट घेतेय... त्याने पटकन चावलेलं बोटं स्वत:च्या तोंडात घातलेलं. मग ती एकदम खळखळून हसायला लागलेली.
इथे एक बरं असतं. दुस-या टेबलवर काय चाललंय, याच्याशी बाकीच्यांना काहीच कर्तव्य नसतं. एखाद्या कपलकडे बाकीचे पाहताहेत, असला गावठीपणा कॉफीशॉप्सच्या सो कॉल्ड कल्चरमध्ये शोभत नाही. अलिखित नियम म्हणा किंवा एथिक्स. पब्लिक प्लेसमध्ये प्रायव्हसीचा स्वर्ग, हेच तर या कॉफीशॉप्सचं महत्त्वाचं वैशिष्ट्यं. इथे तुम्ही एक कॉफी ऑर्डर केली आणि दोन-अडीच तास बसलात तरी कुणीही हटकत नाही. हॉटेलसारखा डोक्यावरचा पंखाही बंद होत नाही. मुळात पंखाच नसतो, सारं कसं एअर कंडिशण्ड... ठंडा ठंडा कूल कूल... पण हे कूल वातावरण कधी कधी फारच हॉट होतं. म्हणजे कोपऱ्यातल्या टेबलावर कॉफीचा आस्वाद घेत 'कुची कुची' करणारं कपल अचानक सोफ्यावर येऊन विसावतं. बहुतेक कॉफीचा कैफ त्यांच्यावर चढलेला असतो. तो तिला अलगद ओढून घेतो आणि मोठ्ठासा किस घेतो. या कल्चरमध्ये त्याला स्मूचिंग म्हणतात... हे सगळं बिनदिक्कतपणे सुरू असतं. कुणी सोफ्यावर, कुणी बिन बॅग्जवर... जणू शेजारी कुणी नाहीच, अशा थाटात त्यांचे राऊण्ड्स रंगतात. सोफ्यावरची ही रासलीला कुणाच्या गावीही नसते. तिथल्या वेटर्सच्याही... त्यांची समाधीवस्था भंग न करताच ते निमूटपणे ऑर्डर टेबलावर ठेवतात आणि निघून जातात. दुपारी एक ते संध्याकाळी पाच-साडेपाच ही वेळ म्हणजे अशा प्रेमात बुडालेल्या कपल्ससाठीचे हॅप्पी अवर्सच..!
लालसर मंद प्रकाश, कानावर पडणारं पाश्चात्य संगीत, कधीमधी टीव्हीवर सुरू असलेला रॉक शो... या वातावरणात आणखी वेगळे रंग भरत असतात. कॉलेजमध्ये लेक्चर बंक करून आलेल्या पोरापोरींचं खिदळणं एकीकडे... कुणी गेल्या वर्षी याच ठिकाणी आपल्या प्रेयसीला पहिल्यांदा प्रपोज केलं म्हणून, प्रपोजल अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणारं... कुणाचा तरी बर्थ डे... कुणी आपल्या ऑफिस कलीगला घेऊनआलेलं... तर कुणी पहिल्यांदाच डेटसाठी मैत्रिणीसोबत आलेलं... वाफाळलेल्या कॉफीचे घुटके घेत लॅपटॉपवर कसलीशी आकडेमोड करत बसलेला एखादा एकटा जीवही याच गदीर्त... पण एका टेबलचं दुस-या टेबलशी काहीही नातं नसतं. प्रत्येक टेबलची निराळी स्टोरी.
A lot can happen over coffee! खरोखरच...
- सुनील घुमे
Monday, November 30, 2009
Thursday, November 12, 2009
गल्लीत घाला गोंधळ
परळचं सेंट्रल रेल्वेचं मैदान... तिथून स्टेशनच्या दिशेने जाणारी चिंचोळी, अंधेरी गल्ली... ब-यापैकी व्हर्जिन म्हणावा असा, हा लव्हर्स स्पॉट. डोळे मिटून दूध पिणा-या, वॉकी-टॉकीवाल्या प्रेमी कपल्ससाठी ही जागा सोयीची....
ऋतुजा आणि संदिप... एकाच बिल्डिंगमध्ये, पण दोन धुव्रांवर राहणारे दोन जीव. ऋतुजा म्हणजे लाजाळूचं झाड. कॉलेज, क्लास, घर. एवढंच तिचं विश्व. त्याच्या नेमका उलट आपला सँडी. बोल्ड अॅन्ड बिनधास्त... ते म्हणतात ना की, दोन विजातीय धुव्रांमध्ये एकमेकांबद्दल आकर्षण असतं. या दोघांचीही केस सेम होती. संदिपला ऋतुजा आवडत होती... पण प्यार का इजहार करणार तरी कुठं, हा प्रश्न होता. बाहेर कुठं बोलवावं, तर ऋतुजा येणार नाही, एवढं नक्की. एखाद्या मित्र-मैत्रिणीला कबुतर बनवायचाही चान्स नव्हता.
शेवटी संदिपनेच एका संध्याकाळी तिला रस्त्यात गाठलं. परळच्या मेन रोडवर. क्लासला जाताना. जरा तुझ्याशी बोलायचंय... पाच मिनिटं. खूप महत्त्वाचं आहे... त्याने सुरूवात केली. संदिप काय विचारणार, हे तिला अचूक उमजलं. पण रस्त्यात असं बोलणं तिला योग्य वाटत नव्हतं. ओळखीचं कुणीतरी पाहिल, अशी भीती तिला वाटत होती. तिची धाकधूक वाढू लागली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येऊन त्यानं तिला आपल्या मागून चालायला सांगितलं. एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून ते चालत होते. संदिपने अचानक मेन रोडवरून सेंट्रल रेल्वेच्या मैदानामध्ये लेफ्ट टर्न घेतला. तीही दबकत अडखळत वामांगी वळली....
परळच्या मेन रोडवरचं सेंट्रल रेल्वेचं हे मैदान. सेंट्रल रेल्वेचा कारखाना आहे तिथं. रेल्वे अधिका-यांची कॉलनीही आहे. एका बाजूला भलंमोठ्ठं मैदान, समोरच्या बाजूला कारखाना आणि उजवीकडे कॉलनी. मेन रोडवरून आत वळलं की, एक रस्ता मैदानाकडे जातो आणि दुसरा रस्ता थेट परळ रेल्वे स्टेशनपर्यंत... खरं तर गल्लीच म्हणता येईल अशी ही जागा. अगदी दिवसाउजेडीही या रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. रेल्वे कामगार सकाळी येतात तेव्हा आणि संध्याकाळी सुटतात, तेव्हाच इथं काय ती गर्दी असते. एरव्ही दिवसभर शुकशुकाट. संध्याकाळी सूर्य मावळला की, या गल्लीत अंधाराचेच राज्य असते. स्ट्रीट लाइटचा उजेड सोडला तर ही गल्ली अंधेरीच असते. मैदानातही काही वेगळी परिस्थिती नाही. दिवसाउजेडी क्रिकेट वा फुटबॉलच्या निमित्ताने इथं पोरं दिसतात. परीक्षेच्या दिवसात मैदानाच्या कोप-यातील सिमेंटच्या बेंचवर बसून अभ्यास करणा-या पोरांची दाटीवाटी असते. मात्र एकदा का सूर्य मावळला की, या भल्यामोठ्या मैदानात फारसं कुणी फिरकत नाही. काळोख एवढा की, शेजारच्या व्यक्तीचा चेहराही स्पष्ट दिसू शकणार नाही.
ही सर्व वैशिष्ट्यं ऋतुजा आणि संदिपसारख्या प्रेमी कपल्ससाठी अॅडव्हान्टेज ठरतात. त्यामुळे ज्या बेंचवर दिवसा मॅच पाहण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी पोरं जमतात, त्याच बेंचवर रात्री प्रितीची रातराणी फुलते. तुटक्या फुटक्या बेंचचा उंचावरचा कोपरा पकडायचा. सर्वात उंच बेंचवर बसलं की आपल्यामागे पाहणारं कुणी नसतं, शिवाय कोण येतंय, कोण जातंय याच्यावर वरून लक्ष ठेवता येतं. (त्यानुसार पोझिशन घेता येते...) कधी कधी बेंचवरच्या मोक्याच्या जागा आधीच फुल्ल झालेल्या असतात. मग मोर्चा मोकळ्या मैदानाकडे वळतो. लाल मातीत, खुरटलेल्या गवतावरच बैठक मारायची... काही मिनिटांनी ती अलगद आपली मान खांद्यावर टाकते. चांगला मूड असेल तर मैदानातच पडायचं. मोकळ्या आकाशातल्या चांदण्या मोजत...
पण ही झाली सेकंडरी स्टेज... प्रायमरी स्टेजमध्ये बसून गुजगोष्टी करण्यापेक्षा बहुतेक कपल्सचा भर वॉकी-टॉकीवरच असतो. म्हणजे चालता चालता भरपूर काही बोलायचं असतं. अशावेळी सेंट्रल रेल्वे हॉलवरून परळ रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारा चिंचोळा रस्ता एकदम बेस्ट. एक तर अंधारी गल्ली, त्यात प्रत्येक दोन मिनिटानंतर नागमोडी वळण. अधुनमधून माणसांची ये-जा सुरूच असते. त्यामुळे निर्जन रस्ता म्हणून काही धोका होण्याचीही शक्यता नाही. जेमतेम दहा मिनिटांत पार करता येईल, एवढीच ही गल्ली असेल. पण इथं दोन ते तीन तास सहज एन्जॉय करता येतात. म्हणजे कसं की, परळ स्टेशनपर्यंत जायचंच नाही मुळी. त्याच्या आधी जी सेंट्रल रेल्वे शाळा लागते तिथून पुन्हा मागे कलटी मारायची. पुन्हा हॉलच्या दिशेने चालायचं, पण हॉलपर्यंत जायचंच नाही. त्याच्या थोडं आधीच पुन्हा घूम जाव... परळ स्टेशनच्या दिशेने. या परेडमध्ये नुसत्या रोमँटिक गप्पा होत नाहीत, रोमँटिक एक्सरसाइजही होतो...
या अशा रोमँटिक गल्ल्या सगळ्याच एरियात असतात. गरज असते ती फक्त आपल्यातल्या कोलंबसला जागं करायची. आणि एकदा का प्रेमात पडलात की तो कोलंबस आपोआप जागा होतो. म्हणतात ना की, गरज ही शोधाची जननी असते! लागा तर मग शोधकार्याला...

Labels:
परळ सेंट्रल रेल्वे मैदान,
लव्हर्स स्पॉट,
सुनील घुमे
Sunday, November 8, 2009
रस्ते प्यार के...
डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाटेला तरुणाईची जत्रा भरते. पहिल्या आंघोळीला नटूनथटून अख्खा यंगिस्तान फडके रोड वर अवतरलेला असतो. इथं मैत्रीचे बंध वृद्धिंगत होतात, प्रेमाचे अंकुर फुलू लागतात.
काय पक्या, वोट बिट डाला की नही..?
म्हणजे काय... एकदम दिलसे!
दे टाळी. आपणबी दिलसे. ग्रुपमधल्या सगळ्यांनी ठरवून केलं वोटिंग.
ग्रुप? म्हणजे आपली कॉलेजची गँग?
मग...
अरे, एक विचारू. ती ढवळेंची सारिका... येते का रे अजून ग्रुपमध्ये?
टिंग टिंग टिडिंग... एक काम कर, दिवाळीला फडके रोडवर भेट. तुला उत्तरही सापडेल आणि सारिकाही...
सीएसटीच्या दिशेने धावणाऱ्या डोबिंवली स्लो लोकलमध्ये, कॉलेजमधले दोन मित्र ब-याच दिवसांनी भेटले होते. त्यांच्या गप्पांची गाडी अर्थातच फडके रोडवरची दिवाळी पहाट या स्टेशनावरच रेंगाळत होती.
डोंबिवलीचा फडके रोड... गेली कित्येक वर्षं दिवाळी पहाटेला या रोडवर तरुणाईची जत्रा भरते. पहिल्या आंघोळीला अभ्यंग स्नान वगैरे करून, झकपक कपडे घालून, नटूनथटून यंग पोरंपोरी इथे जमतात. चौदा-पंधरा वर्षांपासून तिशी-पस्तिशीपर्यंतचा यंगिस्तान फडके रोडवर अवतरलेला असतो, उत्स्फूर्तपणे! कोणाचंही बोलावणं आलेलं नसताना... गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलीय. एरव्ही कॉलेजचं लेक्चर बंक करतील, नाहीतर ऑफिसला बुट्टी मारतील. पण दिवाळी पहाटेच्या दिवशी फडकेवर जायचा नेम यंग ब्रिगेड काही केल्या मोडत नाही. फक्त डोंबिवलीच नव्हे तर कल्याण, उल्हासनगर, बदलापूरपासून तरुण पोरापोरींचे गुप्स या रोड शोमध्ये सामील होतात. एकदम ढिनचॅक माहोल असतो इथला. फ्रेण्ड्सनी एकत्र जमून धम्माल मस्ती करायची, हा त्यादिवसाचा एकमात्र अजेंडा. कुणी ग्रुपसोबत आलेलं, तर कुणी जुन्या ग्रुपच्या शोधात आलेलं. शाळा-कॉलेजनंतर एखाद्या मित्रमैत्रिणीचा कॉण्टॅक्ट तुटला असेल, तर इथे लिंक सापडतात. शंभर टक्के! ओळखीचा कुणीतरी भेटतो, नंबर देतो, इमेल देतो... नशीबवान असाल तर ती व्यक्तीच दत्त म्हणून तुमच्या समोर साक्षात हजर असते. 'दिल ने पुकारा और वो चले आए...'
शेरवानी, झब्बा, सदरालेंगा असा मुलांचा ड्रेस कोड, तर पोरी मस्तपैकी साड्या नेसून, अंगावर दागदागिने घालून, नखशिखांत नटूनथटून आलेल्या. कालपर्यंत कॉलेजच्या कट्ट्यावर जीन्समध्ये रफ टफ दिसणारी ती... साडीमध्ये तिचा लूक एकदम चेंज झालेला असतो. आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. आयला, साडीत काय सही दिसतेस... सेम 'मै हूँ ना'मधली सुश्मिता... एवढ्या कौतुकाने तिच्या गालावर लाली चढते. आपलीही दिल की धडकन सबसे तेज झालेली असते. कानात घंटा घणघणू लागतात. विचारू की नको, विचारू की नको... शेवटी मोठ्ठा श्वास घेऊन एकदाचा तो प्रपोज करतो... 'आय लव्ह यू, माधवी...' दोन क्षण वातावरण टेन्स होऊन जातं. टी-२० मॅचसारखं. लास्ट बॉलवर दोन रन्स हव्यात आणि शेवटची विकेट बाकी असावी तसं... दोन्ही हात तोंडावर घेऊन ती चेहरा झाकून घेते... लाजून चूर. टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडतो. ग्रुपमधले फ्रेण्ड्स कॉन्ग्रॅट्स देतात. दोघांचं ऑन द स्पॉट जमतं. दिवाळीचा फर्स्ट डे, फर्स्ट हो...
एवढं सगळं झाल्यावर सेलिब्रेशनही व्हायलाच हवं. संस्कार भारतीवाल्यांनी काढलेल्या रांगोळ्यांतून आणि फडके रोडवरच्या गदीर्तून वाट काढत सगळा ग्रुप अंबिकामध्ये नाहीतर मॉडर्न कॅफेमध्ये पोहोचतो. खावो, पिवोसाठी... तर आत घुसायलाही जागा नसते. सगळी टेबल्स हाऊसफुल्ल. आप कतार में है, कृपया प्रतिक्षा किजीए... अर्धा-पाऊण तास वेट केल्यानंतर नंबर लागतो. ऑर्डर येईपर्यंत वेळ लागणार असतो. पण इथे घाई आहे कुणाला? एकमेकांची खेचत, नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देत धम्मालमस्ती सुरू असते. फडके रोडवरच्या सगळ्याच हॉटेलमध्ये हाच मूड असतो. जागा मिळाली नाही, तर थेट एमआयडीसीपर्यंत वारी करावी लागते. दुपारी अकरा-बारापर्यंत ही दिवाळी पहाट अशीच रंगत जाते. ऊन्हं वाढू लागली की, मग पांगापांग सुरू होते.
सोशल नेटवर्किंगवाल्यांनाही तोंडात बोटं घालायला लावेल, अशी फडके रोडवरची ही दिवाळी पहाट. विदेशी व्हॅलण्टाइन डेच्या पठडीतला हा मराठमोळा कल्चरल पर्याय. मैत्रीचे बंध आणखी दृढ व्हावेत, वृद्धिंगत व्हावेत, हा या परंपरेमागचा कॉमन मिनियम प्रोग्राम. फडके रोडवरच्या गणपतीबाप्पाच्या साक्षीने फुललेली ही मराठमोळी डेटिंगची परंपरा आता ठाणे-मुंबईच्या अन्य भागातही विस्तारायला लागलीय. ठाण्याचा राम मारुती रोड, तलावपाळी, विलेपार्ल्यातील पालेर्श्वर मंदिर, गिरगावातील फडके गणपती मंदिर या स्पॉट्सवरही अलिकडच्या काळात तरुणााईचा हा ऊरूस भरू लागलाय.
आमची कुठेही शाखा नाही, हे मराठी माणसाचं आवडतं ब्रीदवाक्य. पण आता दरवर्षी दिवाळी पहाटेच्या शुभ मुहूर्तावर फडके रोडचा शाखाविस्तार डोंबिवली फास्टच्या वेगाने सुरूच आहे.

Thursday, October 15, 2009
‘हिरा’नंदानी है सदा के लिए…
फॉरेनला जाणं आपल्याला परवडणार आहे का? पण पवई हिरानंदानीच्या ड्रिम वर्ल्डला जाणं तर शक्य आहे. ‘फॉरेन रिटर्न्ड’ होण्याचा लाइव्ह अनुभव घ्यायचा असेल तर... ‘हिरा’नंदानी है ना, सदा के लिए..!
..............
एक भलामोठ्ठा तलाव... त्याच्या काठावर छोटी छोटी खेडी... डोंगरकपा-यात वसलेली. तुंगा, चांदिवली. कधीकाळी शेती व्हायची तिथं. मग हळुहळु खाणी सुरू झाल्या. हिरव्याकंच डोंगरांचा तुकडा पडू लागला...
आता तिथं मोठ्ठं ड्रीमवर्ल्ड उभं राह्यलंय. हे बडे बडे आलिशान टॉवर्स... आकाशात आरपार घुसलेले... प्रत्येक टॉवरवर ग्रीक शैलीतल्या पॅलेससारखे गोलाकार, आकर्षक घुमट... रस्त्यांच्या दुतर्फा शॉपिंग कॉम्प्लेक्सेस... मॉल्स, फुड प्लाझा, डिपार्टमेंटल स्टोअर्स, हायफाय कपड्यांचे शो रुम्स, अम्युझमेंट पार्कस्, अॅडव्हेंचर स्पोर्टस् सेंटर, लँडस्केप गार्डन्स... काय नाही तिथं. अगदी सेम फॉरेनमध्ये असतं ना तसं...
आता फॉरेनला जाणं आपल्याला परवडणार आहे का? पण फॉरेन रिटर्न्ड होण्याचा लाइव्ह अनुभव घ्यायचा असेल तर... पवई ‘हिरा’नंदानी है ना, सदा के लिए..!
सावळ्या कुंभाराच्या गाढवाने (म्हणजे शापित गंधर्वाने) एका रात्रीत एका खांबावर सात मजल्याची सोन्याचांदीची माडी बांधली... अगदी तसंच हिरानंदानी बिल्डरने आपल्या कल्पकतेने ही जादुई स्वप्ननगरी उभी केली. भूतलावरील सगळी सुखं या एकाच छत्राखाली उपभोगता यावीत, ही बेसिक आयडिया. अगदी सिनेमातही फॉरेनचा एरिया दाखवायचा झाला की, पवईच्या हिरानंदानी परिसरातून कॅमेरा फिरू लागला. विदेशात राहणा-या हिरोच्या घरातून हिरानंदानीची स्कायलाइन दिसू लागली...
पवईच्या या हाय सोसायटी दुनियेतली संध्याकाळ गजबजलेली असते. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईत पाण्याची कारंजी थुईथुई नाचतायत आणि प्रेमी कपल्स हातात हात घालून भटकतायत... फु़ड कॉर्नरवरून कूपनं देऊन आणलेली ग्रील्ड सॅन्डविचेस नाहीतर नूडल्स एकमेकांना भरवले जातायत... सोबत कोल्ड ड्रिंकचा ग्लास किंवा आइस्क्रीमचा कोन. हातात प्लास्टिक पिशवीचे ग्लोव्हज् घालून भय्या (इथंही भय्याचं बरं का..!) बिसलेरी वॉटरमध्ये बनवलेली पाणीपुरी खिलवतोय... थोडं थ्रिल म्हणून गो-कार्टिंगचा थरार जोड्याने अनुभवतोय... प्लॅनेट एममध्ये जाऊन लेटेस्ट म्युझिक एन्जॉय करतोय... त्यानं तिच्यासाठी झक्कास टॉप आणि जीन्स घेतलीय. तिनंही त्याच्यासाठी टी शर्टस् आणि सिक्स पॉकेटस् कार्गो खरेदी केलीय... दोघांनी मिळून केलेली ही पहिलीच एकत्र शॉपिंग.
मॉलमध्ये फिरून फिरून दोघंही थकतात... फुटपाथच्या पाय-यांवरच फतकल मारून बसतात. समोर रस्त्यावर हरत-हेच्या मॉडेलच्या कार पार्क केलेल्या. होंडा सिटी, पजेरो, लॅन्ड क्रूझरपासून सॅन्ट्रो, स्पार्क, अल्टो, वॅगन आरपर्यंत... वेगवेगळ्या आकाराची निरनिराळी मॉडेल्स... आपणही फोर व्हिलर घ्यायची ना, ती लाडिकपणे विचारते. हल्ली कार लोन इझिली मिळतं, नक्की घेऊ... तोही बिनधास्त सांगून टाकतो. मग किती इएमआय येईल, वगैरे कॅलक्युलेशन्स बसल्या जागी सुरू होतात... पोटात आग पडली की, पावलं आपसूक ‘सीसीडी’कडे नाहीतर ‘पिझ्झा हट’कडे वळतात. रोमॅण्टिक गप्पांमध्ये पाऊण-एक तास तरी सहज जातो...
हे सगळं घडतं मोहमयी हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये. अर्थातच त्यासाठी तशी किंमतही मोजावी लागते. खिसा गरम असेल तरच पवई परवडते...
पवई लेकच्या काठावर पूर्वी रांगेने जोडपी बसलेली दिसायची. कधीकाळी इथं बोटिंगही चालायचं. पण आता कपल्सची संख्या फारच कमी झालीय, बोटिंगही बंद झालंय. लेकऐवजी प्रेमी कपल्स लार्सन अॅन्ड टुब्रो नाक्याजवळच्या गार्डनमध्ये जाऊन बसणं पसंत करतात.
गार्डनमध्येच जायचं असेल तर हिरानंदानी गार्डन एकदम बेस्ट. इटुकलं पिटुकलं नाही हे गार्डन. जंगलात आल्यासारखंच वाटतं. दगडही असे रचून ठेवलेत की, ओरिजनल गुंफा असाव्यात, असा भास होतो. बांबूंची वनं इथल्या सौंदर्याला आणखी चार चाँद लावतात. गार्डनमधला पाण्याचा कालवा, त्यात सोडलेले विविधरंगी जिवंत मासे पाहताना मज्जा येते. गार्डनच्या मधोमध उंच मचाणावरून चौफेर नजर फिरवता येते. गार्डन्समध्ये सुरक्षा गार्डही आहेत, पण इतके प्रेमळ की, झाडाझुडपात, दगडामातीत बिनदिक्कत पहुडलेल्या आणि रासलीलेत मग्न झालेल्या प्रेमीजनांना मुळीच हटकत नाहीत. आम पब्लिकसाठी सूर्यास्तानंतर हे गार्डन बंद होतं. पण गार्डकडे नोट सरकवली की, काळोख पडल्यानंतरही आत एन्ट्री मिळते. रात्रीच्या अंधारात इथं प्रितीची रातराणी बहरलेली असते...
दुर्दैवाने हा बहर फारकाळ टिकत नाही. कारण इथून परतीची वाट मोठी बिकट असते. रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक जॅम. बंपर टू बंपर ट्रॅफिक. इथून अंधेरी किंवा विक्रोळी, कांजूरमार्गला पोहोचायचे तर काजवे चमकतात डोळ्यापुढे...
मघाचं ड्रीमवर्ल्ड क्षणात अंतर्धान पावतं, आणि लोकलमधलं घामट जग आपली वाट पाहत ताटकळत असतं...

Wednesday, October 14, 2009
रात्रीस खेळ चाले...
नवरात्रीच्या दांडियामध्ये टिपरीला टिपरी भिडवताना ‘नैन लड गयी है...’ होऊन जातं आणि गरब्याचा फेर धरता धरता पावलं सप्तपदीकडं आपसूक वळतात... पण फ्रेन्डस, नवरात्रीच्या सगळ्याच रात्री सारख्या नसतात...
लोच्या झाला होता...
इज्जतचा भाजीपाला व्हायचीच वेळ आलेली...
नवरात्रीचा पहिला दिवस... संध्याकाळचे सात वाजलेले आणि ज्यांना सुपारी दिली होती, त्या बॅन्जो पार्टीने आयत्यावेळी टांग दिलेली... करायचं काय? गुरूने पहिल्यांदाच दांडियाची जबाबदारी स्वखुषीने अंगावर घेतली आणि ही नस्ती आफत ओढवली.
... पण गुरूचा खरा लोच्या भलताच होता. त्याच्या छोट्या बहिणीसोबत एम.डी. कॉलेजमध्ये शिकणा-या मंदाकिनीला त्यानं दांडियाला बोलावून घेतलं होतं. लाल-हिरव्या चनिया चोलीमध्ये काय सॉलिड दिसत होती ती. ब-याच दिवसापासून मंदाकिनीवर इम्प्रेशन मारण्याची संधी गुरू शोधत होता. पण बॅन्जोवाल्यांनी त्याचा गेम केला होता...
... तरीही रात्री दांडियाचा प्रोग्राम झक्कास झाला. एका डीजेवाल्याला कसाबसा पकडून आणला आणि दांडियाची गाणी वाजवून पोरं-पोरी रात्रीपर्यंत तुफान नाचले. ढिंकी चिकीन ढिंकी चिकीन... डीजेचे वरचे सगळे पैसे गुरूने एकट्याने भरले.
शिवाय बेस्ट ड्रेसचं 500 रुपयांचं बक्षीस मंदाकिनीला देण्यात आलं ते वेगळंच...
....................
आठ वाजल्यापासूनच मिनलची घरात चुळबुळ सुरू होती. कधी एकदा नवा ड्रेस घालून खाली दांडियाला जाते, असं झालं होतं. छानच होता तिचा ड्रेस. सगळ्या पाठीवर एक्स एक्स एक्सचं नक्षीकाम... आणि अगदी सहजपणे दिसेल असा चमकीदार रंगीबेरंगी मोराचा टॅटू... नाचे मयूरीचं जणू... सगळ्या दांडियाचं स्टार अट्रॅक्शन होती ती.
रात्री साडेबारापर्यंत दांडिया रंगला... पोलिस आले आणि स्पीकर बंद करायला लावला. आता काय करायचं? पावभाजीचा बेत ठरला. वीसेक जणांची वरात केईएमसमोरच्या ‘आदिती’मध्ये जाऊन धडकली. आदिती स्पेशल पावभाजी आणि थम्स अपची ऑर्डर.... ऑर्डर आली आणि गोपाळ उभा राहिला. आजचं सगळं बिल मी देणार, अशी अनाऊन्समेंट केली त्यानं. सगळे बेशुद्ध होण्याची वेळ. मग त्यानेच रहस्यस्फोट केला...
जाधवांच्या मिनलची विकेट पडली होती... कॉट अॅन्ड बोल्ड गोपाळ भालेकर..!
......................
अपर्णा आणि संगीता. जीवश्च कंठश्च मैत्रिणी. दांडिया खेळायला त्या एकदम खाली उतरायच्या. पण दांडिया सुरू झाला की, संगीता मध्येच गायब होते, असं अपर्णाच्या लक्षात आलं. चार-पाच दिवस हा खेळ सुरू होता. सहाव्या दिवशी अपर्णाचं सगळं लक्ष संगितावरच होतं. संगिताला तिनं अमोलसोबत जिन्यांकडे जाताना पाहिलं... मध्येच हे दोघे कुठं चालले? पाणी प्यायला..? अपर्णाही त्यांच्या मागोमाग निघाली. पाच मजले वर चढली तेव्हा तिला सगळा प्रकार लक्षात आला.... दांडिया रंगात आला की, हे दोघे गच्चीवर यायचे. गच्चीची चावी अमोलकडे असायची. काळोख्या गच्चीमध्ये हे दोघंच. रात्रीस यांचा वेगळाच खेळ चाललेला...
.......................
नवरात्रीच्या सीझनमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्याच बिल्डिंगमध्ये असाच माहौल तर असतो. टिपरीला टिपरी भिडवताना ‘नैन लड गयी है...’ होऊन जातं आणि गरब्याचा फेर धरता धरता पावलं सप्तपदीकडं आपसूक वळतात. किती ‘गुरू’ आणि किती ‘मंदाकिनी’ या नवरात्रीच्या उत्सवात पहिल्यांदाच भेटतात आणि नंतर कायमचे एकमेकांचे होऊन जातात...
................
बट फ्रेन्डस... नवरात्रीच्या सगळ्याच रात्री सारख्या नसतात...
शीतलसारख्या कमनशिबी मुलींच्या वाट्याला काही काळरात्रीही येतात....
कॉलेजमधल्या ग्रुपसोबत एका मोठ्या दांडियाला जातेय, असं सांगून ती रोज रात्री आठ वाजता घराबाहेर पडायची ती पहाटे तीन-चारलाच घरी परतायची. दांडियाच्या तिकिटासाठी पप्पांकडून करकरीत नोटाही न्यायची. लाडात वाढलेल्या शीतलला कुणी कधीच हटकलं नाही. आणि शेवटी नको तेच झालं... कॉलेजमध्येच सिनिअर असलेला तिचा एक मित्र आणि ती रोज या काळात ‘जीवाची मुंबई’ करत होते. कधी मित्राच्या घरी, कधी लॉजवर... त्यातून शीतल प्रेग्नंट झाली... शीतलच्या मित्राने सरळ हात वर केले. या प्रकाराने तिच्या वडिलांनी हाय खाल्ली... वेळीच लक्षात आलं म्हणून अॅबॉर्शन तरी करता आलं...
.................
नवरात्रीसारखे उत्सवच असतात मुळी आनंदाची लयलूट करण्यासाठी...
परंतु मज्जामस्ती करताना जवानी ‘दिवानी’ होणार नाही, याची खबरदारी आपली आपणच घ्यायला हवी!

Tuesday, October 13, 2009
दिल पुकारे... आरे, आरे, आरे!
गोरेगावच्या पूर्वेला आरे कॉलनीत असलेला बोटिंग क्लब. मुंबईत हाच काय तो एकमेव बोटिंग क्लब उरलाय आता. खिशाला परवडेल अशा भाड्यात बोटिंगचा मनमुराद आनंद इथं लुटता येतो...
Row, row, row your boat,
Gently down the stream
Merily, merily, merily, merily
Life is such a dream…
सिनिअर केजीतला शार्दूल मोठ्याने स्कूलमध्ये नव्याने शिकवलेली पोएम म्हणत होता...
मीही त्याच्या मागून त्याच ओळी गुणगुणायला लागलो...
एक बोट. पाण्याचा प्रवाह कापत पुढं पुढं निघालेली. बोटीत फक्त तो आणि ती. आनंदाने बोट वल्हवत निघालेत... कुठं जायचंय, काहीच माहित नाही... किती वेळ झालाय, ठाऊक नाही. बोट चाललीय, चाललीय... सुंदर स्वप्न डोळ्यासमोर तरळू लागलं...
आणि अचानक आठवलं... अरे, हे तर आपलं आरे गार्डन...
गोरेगावच्या पूवेर्ला आरे कॉलनीत असलेला बोटिंग क्लब. मुंबईत हाच काय तो एकमेव बोटिंग क्लब उरलाय आता. एरव्ही बोटिंग बिटिंग म्हणजे आपल्यासाठीच स्वप्नच. फार तर सिनेमाच्या गाण्यातलं लोकेशन. (आठवलं दिल दिवाना बिन सजना के माने ना...) मुंबईबाहेर महाबळेश्वर किंवा तापोळ्याला गेलो तर रग्गड पैसे मोजून बोटिंगची हौस भागवून घ्यावी लागते. पण आरेतले वारेच काही न्यारे... म्हणजे मुंबईतल्या मुंबईत, खिशाला परवडेल अशा भाड्यात, हिरव्यागार गच्च जंगलाच्या सान्निध्यात, बोटिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची हमखास जागा म्हणजे हा बोटिंग क्लब.
आम्ही सकाळी सव्वा आठ वाजताच तिथं पोहोचलो होतो. गोरेगाव स्टेशनवरून रिक्षा केली आणि आरे गार्डनला आलो. राज्य सरकारची आरे ही दुधाची डेअरी इथं आहे. गोरेगावहून जंगलातून वाट काढत जाणाऱ्या या रस्त्याने थेट पवईला जाता येतं. पण वाहनाने जायचं तर दहा रुपयांचा टोल मोजावा लागतो. आम्ही आरेच्या जंगलात शिरलो तेव्हा सकाळचं प्रसन्न वातावरण होतं. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरचा गजबजाट दोनच मिनिटात लुप्त झाला. सूर्याची सोनेरी, कोवळी उन्हं पाना-फुलांचा अडसर दूर सारत डांबरी रस्त्यापर्यंत पोहोचत होती. पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज ऐकू येत होते. मधूनच एखाददुसरे वाहन रस्त्यावरून पास होत होते. पायी चालणारे अनेकजण दिसत होते. आम्ही बोटिंग क्लबच्या गेटजवळच रिक्षा सोडली.
समोरच्या तळ्याचा अर्धा भाग सोन्यासारखा चमचमत होता. आणि अर्धाअधिक भाग झाडांची सावली पांघरूण अजूनही दुलईतच होता. बोटिंग क्लबच्या काठावर पंधरा-वीस बोटी पाण्यावर अलगद तरंगत होत्या. तिकीट काऊंटर अजून उघडलेलं नव्हतं. एक माणूस आतमध्ये काहीतरी करत होता. दहा-पंधरा मिनिटे आम्ही तिथंच घुटमळत असल्याचं पाहून त्यानंच येऊन विचारलं. बोटिंग करने का है क्या... आम्ही एकदम खूष झालो. गेट उघडून त्यानं आम्हाला आत घेतलं. इतनी जल्दी हम गेट खोलता नही... पण अभी तुम आ गया है तो जाओ... तो म्हणाला. कितना पैसा होगा, भाईसाब... मी आपला मराठी बाणा जागवला. अरे जाओ बाबा... सोच समझ के दे देना... त्यानंही पक्क्या मुंबईकरासारखं उत्तर दिलं. त्यादिवशीची बोटिंगची बोहनी आम्हीच केली.
आधी आम्ही वल्हे मारण्याची बोट घेतली. पण घंटा... तीन-चार मिनिटं झाली तरी बोट जागची हलेचना. म्हणजे मी वल्हा मारला की, ती थांबायची आणि तिने मारला की, मी थांबायचो. बोट तिथल्या तिथंच गोल गोल फिरत होती. शेवटी तो मघाचाच देवदूत पुन्हा धावून आला. वो आपका काम नही... ये पॅन्डलवाला बोट आप ले लो... असं फर्मान त्यानं सोडलं. आम्ही दुसऱ्या बोटीत येऊन बसलो....
त्यानंतरच जवळपास दीड-दोन तास आम्ही तळ्यात होतो. नऊनंतर आमच्यासारखीच आणखी काही प्रेमी कपल्स सोबतीला आली. पण पहिला अर्धा-पाऊण तास आम्ही दोघंच बोटिंगचा आनंद लुटत होतो. आयुष्यात पहिल्यांदाच बोटिंग करत होतो. सायकलसारखं पॅन्डल मारायचं आणि उजव्या हातानं मागची दांडी राइट-लेफ्टला अॅडजस्ट करायची. पाचेक मिनिटातच जमलं बुवा. त्या सुंदर तळ्यात बोटीत आम्ही दोघंच... थोडी धाकधुकही होतीचं. च्यायला, मध्येच बोट उलटली तर... इथं स्विमिंग कोणाला येतंय, बोंबलायला... मनातला शंकासूर डोकं वर काढून काढून रंगाचा बेरंग करत होता. तळ्याच्या मध्यभागी असतानाच सापासारखं काहीतरी हिरवं हिरवं बोटीच्या बाजूने पाण्यातून सरसरत गेलं. चर्रर्रर्र... झालं काळजात. पण ती सोबत होती. मग कसला डर... जीना यहाँ, बुडना यहाँ...
मस्त मज्जा आली. एकदम यादगार, रोमँटिक बोटिंग. तेव्हा मोबाईल नव्हता, नाहीतर छानपैकी फोटो सेव करून ठेवला असता... ऊन वाढू लागलं तसं आम्ही तळ्याकाठी आलो. मघाचा माणूस कुठं दिसंना. पाचेक मिनिटं वाट पाहिली. तो आला. त्याच्या हातावर शंभराची नोट ठेवली... तोही खूष झाला. वापस आना साब... म्हणत त्यानं नोट वरच्या खिशात सरकवली.
तिथून चालतच आम्ही वरच्या बाजूला असलेल्या छोटा काश्मीर गार्डनमध्ये गेलो. गार्डनमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी समोरच्या स्टॉल्सवर शेवपुरी आणि थम्स अपसह पोटोबा केला. एरव्ही हिंदी-मराठी सिनेमात दिसणारं छोटा काश्मीर आज प्रत्यक्ष पाहत होतो. अनेक हिरॉईन्स जिथं मनसोक्त बागडल्या (खरं तर लोळल्या...) ती हिरवळ तुडवत आम्ही चाललो. सुंदर फुलझाडं, उंचच उंच वृक्ष, लता-वेली आणि पायऱ्यापायऱ्यांच्या उतारावरची गारेगार हिरवळ... एक बर्फ सोडला तर काश्मीर याहून नक्कीच वेगळा नसेल, याची खात्री पटली. आजूबाजूला फॅमिली क्राऊड, बच्चेकंपनी तर दिसत होती. पण प्रेमी कपल्स काही नजरेला पडेनात. आपल्या समोरच गार्डनमध्ये शिरलेली कपल्स गेली कुठे, असा प्रश्न पडला होता. दहा-पंधरा मिनिटांनी जेव्हा आम्ही गार्डनच्या मध्यावरील हाऊसवजा कुटीच्या पलीकडे पोहोचलो, तेव्हा उत्तर सापडलं. सगळी कपल्स झाडाझुडपांच्या कुशीमध्ये, ओबडधोबड दगडांवर, पायऱ्यांवर, पायवाटेवर, अगदी जागा मिळेल तिथं पहुडली होती. अनेकांची प्रेमाराधना ऐन रंगात आली होती. या दुनियेचे पाश तोडून त्यांची केव्हाचीच ब्रह्मानंदी टाळी लागली होती. कुणीतरी स्टॅच्यू केल्यासारखं काहीजण समाधीस्थ झाले होते. छोटा काश्मीर नव्हे, छोटा स्वर्गच इथं अवतरल्यासारखं भासत होतं.
या प्रेमयज्ञात आम्हीही आमच्या वाट्याची थोडी समिधा टाकली... आणि दुपारनंतर आरेच्या स्वर्गातून पुन्हा जमिनीवर आलो...

Tuesday, September 22, 2009
ओ माय लव्ह... गणेशा!
गणपती दर्शनाच्या लाइनमध्ये अनेकांना त्यांची लाइफलाइन सापडते. विसर्जनाच्या मिरवणुकीतही अनेकांचं सूत जुळतं. बाप्पा पावला, तर पुढच्या वर्षी हे दोघं त्याच गणपतीला जोडीने जातात.
सर्वांच्या लाडक्या गणेशाचा फेस्टिव्हल नुकताच धूमधडाक्यात साजरा झाला. पूर्वी गणेशोत्सव होता... हल्ली त्याचाच फेस्टिव्हल बनलाय. पण गणेशोत्सव असो, नाहीतर गणेशा फेस्टिव्हल, प्रेमी कपल्सना काय फरक पडतोय? या काळातील रस्त्यावरची वाढलेली गर्दी, दर्शनासाठीच्या लांबसडक रांगा आणि वाजतगाजत निघालेल्या विसर्जनाच्या मिरवणुका प्रेमीजनांसाठी नेहमीच राजमार्ग ठरत आल्या आहेत.
पूर्वी एका रात्रीत परळ-लालबागचे सगळे गणपती पाहून व्हायचे. आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीच सहा-सात तास रांगेत खचीर् पडतात. अरे, मग उलट बरंय ना. रात्री आमचा ग्रुप गणपती बघायला जातोय, असं घरी सांगून आधी एकदाच पार्टनरला भेटायचा चान्स मिळायचा. गर्दीमुळे हीच संधी आता दोन-तीनदा मिळते. फ्रेण्ड्ससोबत जातोय, असं सांगून जोड्याने बाप्पाच्या दर्शनाला आलेली कपल्स गणेशगल्ली किंवा लालबागच्या राजाच्या लायनीत पावलापावलावर दिसतात. हातात एक जास्वंदीच्या फुलांचा हार किंवा नारळ, एवढ्या भांडवलावर लाइनीत उभं राहायचं. शक्यतो आपल्या पुढे आणि मागे फॅमिली क्राऊड आहे, याची खात्री करून घ्यायची. टारगट, पोरापोरांचा ग्रुप असेल तर तिथून न चुकता कलटी मारायची. पोरापोरींचा एकत्र ग्रुप असेल तर धम्माल! त्यांच्याशी जुजबी ओळख करून घ्यायची. मोबाइलच्या कॅमे-यातून त्या ग्रुपसोबत फोटो काढून घ्यायचे आणि घरी तेच फोटो दाखवून, आमच्या ग्रुपने काय सॉल्लिड मज्जा केली याचे किस्से रंगवून सांगायचे... व्हॉट अॅन आयडिया, सरजी!
गणपती दर्शनाच्या लाइनमध्येच कधी कधी आपलीही लाइफलाइन सापडते. म्हणजे कसं... आपण आपल्या मित्रांसोबत रात्र जागवायला बाहेर पडलोय. त्याच रांगेत पुढेमागे एक छान, सुंदर पोरगी उभी आहे. नजरानजर होते... एकदा, दोनदा, पुन्हापुन्हा... रांग पुढे सरकायला लागते आणि आपल्या डोक्यातली चक्रही. कानात घुंगरं वाजायला लागतात... लव्ह अॅट फर्स्ट साइट. मंडप जवळ येईपर्यंत तोंडओळख झालेली असते. एकमेकांचा मोबाइल नंबर किंवा इमेल आयडी मिळवला की समजायचं... लाइन क्लिअर.
अनेक कपल्स खरोखरच फ्रेण्ड्ससोबत रात्री गणपती पाहायला येतात. पण गणपती दर्शनापेक्षा तिथे भरलेली जत्रा एन्जॉय करणं, हाही हेतू असतो. ग्रुपमध्ये जे कुणी सिंगल असतील त्यांनी रांगेत उभं राहायचं. किती वेळ लागेल, याचा साधारण अंदाज घ्यायचा. कपल्सनी तेवढा वेळ जत्रेत मजा करून यायची. आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, वडापाववर ताव मारायचा. नाहीतर एखादा कोपरा शोधून टाइमपास करायचा. नंबर जवळ आला की, पुन्हा ग्रुपमध्ये सामील व्हायचं.
गणपती दर्शनाची ही रात्र काहींच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते. संदेश नावाच्या आपल्या एका मित्राला दोन वर्षांपूर्वी असाच अनुभव आला. तो मित्रांसोबत रात्री गणपती पाहायला गेला असताना गणेशगल्लीजवळ तीन पोरी रडत होत्या. आजूबाजूला गर्दी जमलेली. कळलं की, त्या तिघींचा छोटा भाऊ हरवलाय म्हणून. मग काय, संदेशमधला कार्यकर्ता जिवंत झाला. ग्रुपमधल्या पोरांना त्याने कामाला लावलं. कुणी गणेशगल्ली, कुणी तेजूकाया, कुणी लालबागचा राजा... कुणी रंगारी बदक चाळ गाठली. माइकवरून हरवलेल्या भावाचं नाव आणि वर्णनाची अनाऊन्समेण्ट होऊ लागली. पण तो काही सापडेना. संदेश त्या तिघींसोबत चिंचपोकळीच्या गणपतीजवळ आला. तेवढ्यात माइकवरून अनाऊन्समेंट. एका मुलाच्या तिघी मोठ्या बहिणी हरवल्या आहेत म्हणून... सर्वांनी मंडपाकडे धाव घेतली. तिथे छोटा भाऊ चहा बिस्किटं खात बसला होता. तिघींना त्यांचा धाकटा भाऊ भेटला... आणि संदेशला? गेल्याच वर्षी त्यातील मधल्या बहिणीशी संदेशचं लग्न झालं... बाप्पा पावला!
जी मजा गणपती पाहायला, त्यापेक्षा कितीतरी अधिक गणपती विसर्जनाला. विशेषत: घरगुती गणपती. चाळीतील शेजारच्या काकांचा गणपती सोडायला न चुकता येणारी त्यांची भाची किंवा कुणी नातेवाईक पोरगी. तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठीची धडपड. मोठ्या आवाजात आरती म्हणणं किंवा नाशिक बाजावर ढिनचॅक डान्स करणं. मिरवणूक ऐन रंगात आली की, तिच्या गालाला हळूच गुलाल लावणं. अर्ध्या रस्त्यात तिला गुपचूप वडापाव आणून देणं... सगळं कसं रोमांचकारी. काहीच नाहीतर शेजारून चाललेल्या दुस-या गणपतीच्या टेम्पोवर फिल्डिंग लावायची. 'कहाँ चली है गोरीयाँ... गणपती बाप्पा मोरया...'चा आवाज द्यायचा. आपल्या टेम्पोतून त्यांच्या टेम्पोमध्ये गुलाल फेकायचा, नेम धरून... पोरगी हसली की, समजायची फसली. पण कधी कधी लोच्या होतो. आपलं हे नेमबाजीचं कौशल्य नेमकं तिच्या मोठ्या भावाच्या डोळ्यात खुपतं. मग राडा हा ठरलेलाच. बाप्पाच्या कृपेने रांगेत नाहीतर मिरवणुकीत अनेकांचे दोनाचे चार हात होतात. पुढच्या वर्षी त्याच गणपतीला ही दोघं जोडीने जातात. गणपतीच्या रांगा आणि त्यात तरुणाईचं प्रमाण दरवर्षी का वाढतं, त्यामागचं खरं लॉजिक हे असं आहे.

Subscribe to:
Posts (Atom)