म्हातारीचा बूट काय किंवा हँगिग गार्डन. इथल्या झाडावेलींमध्ये बच्चेकंपनीपेक्षा प्रेमी कपल्सच जास्त दिसतात. सकाळ-संध्याकाळी जॉगिंगला येणा-या गर्भश्रीमंत मलबार हिलवाल्यांपेक्षा ‘दिलबर हिल’वाल्यांचीच संख्या कितीतरी अधिक असते.
तुम्हाला आठवते लाइफमधली पहिली पिकनिक..?
राणीची बाग, छोटा काश्मिर किंवा नव्याण्णव टक्के म्हातारीचा बूट..!
बहुतेक यापैकीच कुठंतरी आपण पहिल्यांदा जातो. बालपणी पाहिलेल्या त्या राणीच्या बागेची किंवा म्हातारीच्या बुटाची एक इमेज आपल्या डोक्याच्या हार्ड डिस्कमध्ये परमनंटली सेव्ह झालेली असते. जसजसं वय वाढतं, किंबहुना जसं आपण वयात येतो तसतसं त्या इमेजमधील कलर्स बदलत जातात. जुन्या ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटोतला म्हातारीचा बूट कलरफुल होतो.
प्रेमात पडलो ना की, हे कलर आणखी उजळतात. त्यांचं इंद्रधनुष्य बनतं...
बच्चे असताना कधीकाळी पहिल्यांदा पाहिलेला म्हातारीचा बूट. त्या बुटाच्या आतून लोखंडी शिड्या चढत वरच्या मजल्यापर्यंत धावत जायचं. बुटाच्या गॅलरीत गेल्यावर खाली उभ्या असलेल्या माणसांकडे पाहून जोरजोरात किंचाळायचं, वाकुल्या दाखवायच्या... बुटावरुन खाली घसरायचं... आयुष्यात पहिल्यांदा प्रेमात पडलो ते या म्हातारीच्या बुटाच्याच. आईशप्पथ!
आणि जेव्हा खरोखरच प्रेमात पडलो तेव्हा ‘ति’लाही अनेकदा तिथंच घेऊन गेलो. बुटाची शप्पथ!
मलबार हिलच्या या टेकडीवरुन गिरगाव चौपाटीचा सीन एकदम झक्कास दिसतो. म्हणजे आकाशात उडणा-या घारीला खालची जमीन कशी दिसत असेल, अगदी तसंच इथून गिरगाव चौपाटीचं दर्शन होतं. म्हातारीच्या बुटात शिरायचं वय उरलं नाही. पण तिथं गेलो की एकदा तरी बुटाला हात लावावंसं वाटायचं. मध्यंतरी बुटात कुणाला जाऊ देत नव्हते. वाईट वाटलं. नंतर कधीतरी छान रंगरंगोटी केली बुटाला. म्हातारीच्या बुटाजवळची बाग तर खूपच सुंदर आहे. त्यापलीकडे बच्चे कंपनीला खेळण्यासाठी मोठं गार्डन आहे. रस्ता ओलांडून पलिकडे गेलं की समोरचं हँगिंग गार्डन तर... व्वा क्या बात है! अजूनही तिथं वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकारात सजवलेली छोटी छोटी झाडं-वेली, कमानी आहेत. तिथल्या हिरवळीवर बसायचं, गाणी म्हणायची किंवा खेळायचं... आईचा रुमाल हरवला, तो मला सापडला...
हल्ली एक फरक जाणवला तो म्हणजे बच्चे कंपनीपेक्षा इथं कपल्सची गर्दी वाढली आहे. म्हातारीच्या बुटाशेजारच्या बागेतील बेंच कपल्सनी अडवलेले असतात. गार्डनमधून वर टेरेसवरही जाता येतं. तिथं तर कपल्सचाच डेरा असतो. समोरच्या हँगिग गार्डनच्या झाडावेलींमध्येही जागा मिळेल तिथे कपल्स एके कपल्सच दिसतात. सकाळ-संध्याकाळी जॉगिंगला येणा-या गर्भश्रीमंत मलबार हिलवाल्यांपेक्षा ‘दिलबर हिल’वाल्यांचीच संख्या कितीतरी अधिक असते. त्यात दुपारच्या नंतर मुंबई दर्शनवाल्यांच्या बसेसची भर पडते.
मध्यंतरी आपला एक मित्र त्याच्या होणा-या बायकोला घेऊन म्हातारीचा बूट पाहायला गेला होता. दोघांचा साखरपुडा झालेला. परंतु दोघंही घरच्यांना न सांगता परस्पर गुपचूप भेटले होते. एकमेकांचा हात हातात घेऊन त्यांच्या भावी आयुष्याच्या गुजगोष्टी रंगल्या होत्या. एवढ्यात... एवढ्यात... अचानक तीन-चार पालिकेचे सुरक्षारक्षक तिथे धावत आले. काही कळायच्या आतच त्या दोघांवर त्यांनी झडप घातली. काय चाळे सुरु होते तुमचे..? त्यांनी दम भरायला सुरुवात केली. तिची तर घाबरगुंडीच उडाली. आजुबाजूचे सगळे लोक हा तमाशा पाहत होते. सुरक्षारक्षक काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. उठा... तुमची वरात आता पोलिस स्टेशनवरच नेतो, त्यांनी पुन्हा दरडावले. पोलिस स्टेशनचे नाव ऐकताच तिची बोबडीच वळली, तिनं मोठ्याने गळा काढला. शेवटी त्या दोघांची सुटका केली ती ‘गांधीबाबा’नं... पाचशे रुपये सुरक्षारक्षकांच्या हातात त्याने कोंबले, तेव्हा कुठं मांडवली झाली... पण त्याच्या बायकोने म्हातारीच्या बुटाचा धसका घेतला तो कायमचा...
हँगिग गार्डनपासून दहा मिनिटाच्या अंतरावरच बाणगंगा आहे. का कोण जाणे, पण हा स्पॉट मला तरी फारसा कधी आवडला नाही. जेव्हा जेव्हा तिथं गेलो, तेव्हा तिथं कुणाचं तरी श्राद्ध सुरु असायचं. नाहीतर म्हाता-या गुजराथी बाया अगदी ग्रुपग्रुपने तिथं पवित्र स्नानाला आलेल्या असायच्या. तळ्याचं पाणी ब-यापैकी कमी झालेलं. त्या पाण्यातच काहीजण कपडे धुवायचे. कुत्री पाय-यांवर लोळण घेत पडलेली. श्राद्धाच्या खरकट्यावर कावळ्यांचा हल्लाबोल. फारच किळसवाणं असायचं ते दृश्य. बाणगंगेच्या समोरच समुद्राला खेटून एक छोटंस गार्डन आहे. तिथं मात्र बसायला आवडायचं. कारण या गार्डनमध्ये एकतर गर्दी नसायची, शिवाय समुद्र एकदम मस्त दिसायचा. दुपारच्या वेळी तर या गार्डनमध्ये चीटपाखरुही असत नाही... कळलं? समझनेवालों को इशारा काफी है...
मलबार हिलवरचा सर्वात चांगला लव्हरस्पॉट कुठला माहित आहे? कॅफे नाझ..? नाही. जुन्या हिंदी सिनेमात गाजलेला कॅफे नाझ तर केव्हाचाच बंद पडलाय... म्हातारीच्या बुटाच्या थोडं पुढं चालून खाली बाबुलनाथला उतरुन जायला पाय-या आहेत. दगडी पाय-यापाय-यांचा हा रस्ता. मलबार हिलवरुन थेट बाबुलनाथ मंदिराच्या दारात फक्त पाच मिनिटात पोहोचवतो. इथून गिरगाव चौपाटीलाही जाता येतं. ब-यापैकी रुंद पायवाटीचा हा रस्ता म्हणजे प्रेमी कपल्सचा फेव्हरिट अड्डा. झाडांच्या सावलीत विसावलेल्या या पायवाटेच्या दोन्ही बाजूला मजबूत कठडा आहे. या कठड्यावर बसून तासनतास घालवता येतात. कुणीही तुम्हाला हटकत नाही. मोजकी वर्दळ, म्हटलं तर निर्जन अशी ही जागा. विशेषतः दुपारच्या वेळी. प्रेमी कपल्ससाठी हा एकदम हॉटस्पॉट.
आपली पायरी ओळखून प्रेम करावं, हे तिथंच शिकता येतं. देवाशप्पथ!
- सुनील घुमे
Saturday, August 22, 2009
Friday, August 21, 2009
बांद्रे बँडस्टॅन्ड... इटस् रॉकिंग!
बिनधास्त कपल्स कडेकडेने नाही, सरळ खडकावरुन मजल दरमजल करत समुद्राला जाऊन भिडतात. बँडस्टॅन्डच्या खडकावर बसून प्रेम करणं म्हणजे एकदम रॉकिंग एक्सपिरियन्स! इटस् रॉकिंग, यारा कभी इश्क तो करो..!
बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत...
कसे रुजावे बियाणे, माळरानी... खडकात...
हाय फ्रेंडस्, काय आठवलं..?
... गोट्या!
बरोब्बर... लहानपणी पाहिलेल्या ‘गोट्या’ सिरीयलचं हे टायटल साँग.
खडकामध्ये बीजाला अंकुर फुटत नाही, खडकावर बियाणं रुजत नाही, हे खरंच. पण प्रेमापुरतं बोलायचं झालं तर प्रेम हे या नियमाला अपवाद ठरतं. किंबहुना प्रेम हे सर्वच नियमांना अपवाद ठरतं. कसं? कारण खडकावरही प्रेम फुलतं. खडकावरच तर प्रेम खुलतं.
खडबडीत खडकावरील रेशीमस्पर्शी प्रेमाची ही दुनिया पाहायची असेल तर बांद्र्याच्या बँडस्टॅन्डला जायला हवं. अरबी समुद्राच्या कुशीत विसावलेला हा स्पॉट म्हणजे प्रेमी कपल्सच्या फेव्हरिटपैकी एक. ‘गोट्या’ पाहता पाहता प्रेमात कधी पडलो, ते कळलंच नाही. प्रेम म्हणजे खवळलेला दर्याच. समुद्राला आलेलं तुफान. त्यामुळं प्रेमात बुडालेले प्रेमवीर खरोखरीच्या समुद्रात शिरुन प्रेम करायला मुळीच डरत नाहीत.
बांद्रा स्टेशनवरुन रिक्षा करायची आणि बँडस्टॅन्डवर यायचं. ज्यांना प्रेमाच्या गुजगोष्टी करायच्या असतील त्यांना वॉक हा एक पर्याय आहे. इथल्या लँडस्केप गार्डनमधून पायी चालायचं. मनसोक्त गप्पाही होतात आणि प्रितीची बागही फुलते. प्रेमाच्या प्रायमरीमध्ये असलेल्यांनी असं कडेकडेने फिरायचं. अगदी सी रॉक म्हणजे आताच्या ताज लँडस् हॉटेलपर्यंत किंवा त्याहीपुढे किल्ल्यापर्यंत चालत जायचं. तोच तो पडझड झालेला ‘जाने तू…’ वाला किल्ला. तिथून समोरच्या समुद्राचा व्ह्यू सॉलिड दिसतो. सी फेसिंग आलिशान फ्लॅटच्या बाल्कनीत बसल्यासारखा फिल येतो...
ज्यांनी प्रेमाची सेकंडरी स्टेप गाठली आहे, त्यांच्यासाठी जवळचं एक गार्डनही आहे. शाहरुख खानच्या बरोब्बर बंगल्यासमोर. ते कायम कपल्ससाठीच रिझर्व्हड असतं. बाय द वे तुमची ती जर शाहरुखची फॅन असेल तर तिला ‘मन्नत’समोरुन एक राऊंड मारुन आणा. किंग खान नाही, पण त्याच्या ड्रिम हाऊसचा भलामोठा बंद दरवाजा पाहून ती हंड्रेड पर्सेंट खूष होईल. लागली ब ब ब ब बेट... या कॅटेगरीतली कपल्स जवळच्या माऊंट मेरीच्या चर्चमध्येही न चुकता हजेरी लावतात. माऊंट मेरीसमोर मेणबत्ती पेटवून ‘मन्नत’ मागतात...
उरले ते प्रेमाची थर्ड डिग्री गाठणारे. ही बिनधास्त कपल्स कडेकडेने नाही, सरळ खडकावरुन मजल दरमजल करत समुद्राला जाऊन भिडतात. या खडकांवरुन चालणं म्हणजे एकदम रॉकिंग एक्सपिरियन्स! इटस् रॉकिंग, यारा कभी इश्क तो करो... इटस् रॉकिंग! एकेक पाऊल जपून टाकत, मध्येच जंप मारत ही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. सोबत असलेली ती आपला नाजूकपणा जपत असते. जास्त पुढं नको, इथंच थांबूया, असं ती म्हणते. मग आपण तिचा हात धरायचा आणि खेचायचं. ती लाडिक आढेवेढे घेईल. आपणही इम्प्रेशन मारण्यासाठी हिरो व्हायचं. दगडावरुन कशी सहज उडी मारता येते, त्याचं प्रात्यक्षिक दाखवायचं. पण कधी कधी मोठ्ठी गंमत होते. म्हणजे हिरोगिरी करण्याच्या नादात बुळबुळीत दगडावरुन पाय स्लिप होतो आणि धपा...क् होतं. सगळ्या मूडची आणि कपड्यांचीही ‘आयझेड’ होते... खडकावरची ही सप्तपदी जरा जपूनच पार करायची...
जरा लांबवर पोहोचलो की, एखादा आडोशाचा खडक शोधायचा. बाजूला एखादं कपल असेल तरी हरकत नाही. उलट बरंच. वेळप्रसंगी कुणीतरी बाजूला आहे, ही बाब पुढच्या ‘कार्या’ला आणखी बळ देते... संध्याकाळची वेळ असेल तर मस्तपैकी तिच्या कुशीत शिरुन सनसेट पाहायचा. पोझिशन नेमकी उलटी असेल तर तिच्या केसांमधून बोटं फिरवत राहायचं. मोबाईलवर छानपैकी अमिताभचं जुनं गाणं लावायचं. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है... एकदम रोमँटिक माहौल. आता अशा रोमँटिक वातावरणात समुद्राबरोबरच प्रेमालाही भरती आली, तर त्यात आपला काय दोष? प्रेमात आकंठ बुडणं म्हणजे काय, याचा साक्षात्कार बँडस्टॅन्डच्या या खडकाळ जगतात पावलापावलावर दिसतो. कधीकधी ही कपल्स प्रेमसागरात एवढी बुडालेली असतात की, आजुबाजूला भरतीचं पाणी वाढतंय, याची शुद्धही त्यांना राहत नाही. भरतीच्या पाण्यात अडकून कपल्स बुडाल्याच्या घटना अनेकदा इथं घडल्या आहेत. तेव्हा बी केअरफुल! घरी आणखी कुणीतरी तुमची वाट पाहतंय...
आता प्रेम म्हटलं की प्रेमाचे पहरेदारही आलेच. पोलिस कधी कधी इथे धाडी घालून रसभंग करण्याचे त्यांचे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडतात. बंदी असलेल्या डान्स बारमधल्या पोरींना कसं पकडतात, अगदी तसंच प्रेमी कपल्सची वरात रीतसर पोलिस ठाण्यात पोहोचते. संताप... राग... हुंदके... रडारड... आक्रोश... सगळ्या भावभावनांचा नुसता कल्लोळ होतो. कधी नुसती हूल देऊन सुटका होते, तर कधी मामला फाइन भरेपर्यंत ताणला जातो. कुणी जास्तच पंगा केला तर सरळ मुलीच्या आणि मुलाच्या घरी फोन करुन त्यांच्या प्रेमलीलांचा अध्याय पोलिस घरच्यांसमोर वाचून दाखवतात. त्यामुळे दुर्दैवाने अशी वेळ कधी आलीच तर सरळ पोलिसमामांच्या हातापाया पडायचं, गयावया करायची. 99 टक्के काम झालंच म्हणून समजा.
… शेवटी खाकी वर्दीच्या आतही माणसाचंच हृदय असतं. ते विरघळतं...

Monday, August 17, 2009
प्रेमाची सी लिंक
मुंबईच्या समुद्रावर कुणाची हुकूमत असेल तर प्रेमीजनांची. 'प्रेम करुया खुल्लम खुल्ला' हा इथला मंत्रा असतो. शाळा-कॉलेजमध्ये असताना फ्रेण्ड्ससोबत आणि प्रेमात पडल्यानंतर गर्लफ्रेण्डसोबत... पावलं वळतात ती सागरकिनारीच!
मायानगरी मुंबईच्या सौंदर्यात नवी भर पडलीय ती वांद्रे-वरळी सी लिंकची. महाराणीचा लखलखता नवा नेकलेसच जणू.
आजवर संध्याकाळच्या मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून 'जिने-मरने की कसमे' खाणारी प्रेमी कपल्स. यापुढे त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार असेल तो रात्रीच्या अंधारात लुकलुकत्या दिव्यांनी न्हाऊन निघालेला सी लिंक. समुद्रकिनारचा खारा वारा, उसळणा-या लाटांची गाज, समोरचा लुकलुकता केबल ब्रीज आणि सोबत हवीहवीशी ती... असा रोमॅण्टिक सीन आणखी कुठे असणार?
प्रेमी कपल्सचा मोर्चा शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरुन चौपाटीजवळच्या गार्डनमध्ये शिरलाय तो उगाच नाही. समुद्र किनारा आणि प्रेमी कपल्स हे नातं एकदम अतूट. फेविकॉल का मजबूत जोड... टुटेगा नही. दादर, गिरगाव, जुहू चौपाटी, मरिन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया, वरळी सी फेस, वांद्रे रेक्लमेशन, बॅण्डस्टॅण्ड, मार्वे-मनोरी, अक्सा, मढ ते पार अर्नाळा बीचपर्यंत... समुदावर कुणाची हुकूमत असेल तर प्रेमीजनांची. प्रेम करुया खुल्लम खुल्ला, हा इथला मंत्रा असतो. शाळा-कॉलेजमध्ये असताना फ्रेण्ड्ससोबत आणि प्रेमात पडल्यानंतर गर्लफ्रेण्डसोबत... पावलं वळतात ती सागरकिनारीच.
समुद्रावर गेल्यावर आधी एक मस्तपैकी राऊण्ड मारायचा. एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत, हातात हात घालून. खरं तर राऊण्ड हे एक निमित्त असतं. कुठे चांगली आणि मोक्याची जागा मिळेल, याची उभ्या उभ्या केलेली ती पाहणीच. चाणाक्ष लोकांना ती पटकन सापडते. बाकीचे नुसतेच हेलपाटे घालून थकतात. कुणालाही सहज दिसणार नाही, अशी जागा पकडायची म्हणजे मोठं कसब असतं. एकदा असा कोपरा सापडला की, दिवस सार्थकी लागल्याचे भाव चेह-यावर उमटतात. पुढचे दोन-तीन तास आपण वेगळ्याच दुनियेत असतो...
याबाबतीत आपली शिवाजी पार्कची चौपाटी एकदम बेस्ट. तृतीयपंथी आणि टारगट पोरं सोडली तर बाकी काही त्रास नसतो. गिरगाव चौपाटीवर आडोसा असा उरलेलाच नाही. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यामागची गार्डनची जागा कशीबशी रिझर्व्हेशन टिकवून आहे. त्यात भरीला पोलिसांचा त्रास. त्यामुळे वाळूपेक्षा नाना-नानी पार्काशेजारचा कट्टाच चांगला. गिरगाव चौपाटीवर चांगलं काय असेल तर इथली खानपान सेवा. भेळपुरी प्लाझामध्ये जाऊन भय्याच्या गाडीवरची शेवपुरी, पाणीपुरी चाखायची किंवा बर्फाचा गोळा खायचा... अर्थात शेअर करुनच. ती गंमत एकदम भारी असते, पैसा वसूल!
मरिन ड्राइव्ह म्हणजे कॉलेजच्या पोरापोरींचा अड्डा. अगदी भल्या सकाळीच ही प्रीतीची पाखरं तिथे किलबिलाट करायला हजर असतात. बिच्चारे मॉर्निंग वॉकवाले... त्यांना ही प्रभात फेरी धावती का होईना, पण पाहावीच लागते. सकाळी आणि संध्याकाळी मुंबई दर्शनवाल्यांच्या बसेस इथल्या लोकसंख्येत भर घालतात. यूपी-बिहारमधून पहिल्यांदाच बम्बईला आलेल्या भाभी-भौजाई चौपाटीवर गळ्यात गळे घालून बसलेल्या पोरापोरींकडे टकामका पाहत बसतात. डोईवर पदर असला तरी त्यांचे चेह-याचे भाव खूप काही सांगून जातात. पावसात भिजत मरिन ड्राइव्हच्या कट्ट्यावर खवळलेला समुद्र पाहताना मज्जा येते. तिखटमीठ लावलेला, लिंबू पिळलेला भुट्टा दोघांत मिळून खाताना त्याची चव आणखी वाढते. राणीच्या रत्नहाराला खरी झळाळी येते ती रात्रीच्या वेळी. मरिन ड्राइव्हच्या फ्लायओव्हरवर बसून चमचमती मुंबई पाहण्याची गंमत तिथेच अनुभवता येते. कपल्ससाठी हे ठिकाण ब-यापैकी सेफ आहे. परंतु मध्यंतरी याच ठिकाणी मित्रासोबत फिरायला आलेल्या एका मुलीवर एका पोलिसाने भर पोलिस चौकीतच बलात्कार केला होता, हे विसरुन चालणार नाही.
वरळी सी फेस हल्ली क्राऊडेड झालाय. शनिवारी-रविवारी तर इथे पाय ठेवायला जागा नसते. सगळे फॅमिलीवाले जमत असल्याने प्रेमी कपल्सची गोची होते. आता तर वांद्रे-वरळी सी लिंक इथेच रिकामा होणार असल्याने सी फेसवरचं ट्रॅफिक आणखी वाढणार. नाही म्हणायला वरळी कोळीवाड्याच्या बाजूला असलेल्या छोट्या गार्डनचा आधार तेवढाच कपल्ससाठी उरलाय. या गार्डनमध्ये एवढ्या दाटीवाटीने कपल्स बसलेली असतात की, आपल्या माणसाच्या खांद्यावर हात टाकावा तरी तो तिस-यापर्यंत पोहोचतो. मग 'सॉरी...', 'एक्स्क्यूज मी...' वगैरे फॉर्मलिटीज पाळाव्या लागतात.
गेट वे ऑफ इंडियावर हौशे, नवशे, गवशे यांचीच कायम गर्दी. देशी-विदेशी पर्यटकांची संख्या तिथे जास्त. तरीही प्रेमी कपल्स गेट वेला आवर्जून हजेरी लावतातच. गर्दीपासून थोडं दूर ताजच्या समोर किंवा रेडिओ क्लबच्या दिशेने त्यांना आपला मोर्चा वळवावा लागतो. ज्यांना समुद्रातून एक फेरफटका मारुन यायचा असेल त्यांच्यासाठी इथं लाँचची व्यवस्था आहे. रात्रीच्या वेळी समुद्रातून गेट वे आणि ताजचा परिसर खूपच सुंदर दिसतो. अशीच एखादी चाँदनी रात आवडीच्या माणसासोबत अनुभवण्यासाठी ही लाँच फेरी एकदम मस्त.
सागर किनारे, दिल ये पुकारे... गुणगुणत.

Tuesday, August 11, 2009
जंगल में मंगल
पावसाळ्यातली नॅशनल पार्कची सफर हा स्वर्ग असेल, तर बाकीच्या मोसमात स्वर्ग फक्त दोन बोटं उरलेला असतो. ऋतू कुठलाही असो, इथं प्रेमाला आणि प्रेमिकांना सदैव पालवी फुटलेली असते.
टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगायी
आग लगी दिल में तो, दिल को तेरी याद आयी...
महिनाभराच्या रुसव्यानंतर पावसाच्या जलधारा कोसळू लागल्यात... पहिल्या पावसाचा गंध सर्वदूर पसरलाय... आषाढसरींनी अख्खा आसमंत चिंब चिंब झालाय... पुन्हा एकदा रान हिरवंगार झालंय... अशावेळी याद येते ती... प्रेयसीची? ती तर कायमच येते हो...
अशावेळी याद येते ती नॅशनल पार्कची...
अहाहा... हिरवंगार, ओलेतं नॅशनल पार्क. (सरकारी भाषेत बोरिवलीचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.) प्रेमात पडलेल्या प्रत्येकानेच रिमझिम पावसात भिजत कधी ना कधी नॅशनल पार्क पालथा घातलेला. ज्यांनी हा आनंद लुटला नाही किंवा लुटता आला नाही, त्यांच्यासारखे तेच... कमनशिबी!
बोरिवली पूवेर्ला रिक्षात बसून हायवेवरच्या नॅशनल पार्काच्या दारात उतरायचं. त्याने रिक्षाचे पैसे द्यायचे आणि तिने छत्री उघडून कावऱ्याबावऱ्या नजरेने कुणी आपल्याकडे पाहत तर नाही ना, याचा कानोसा घ्यायचा. विण्डचिटर घातलेल्या त्याने मग तिच्या लेडीज छत्रीत शिरायचं... डिट्टो राज कपूरच्या 'श्री ४२०'मधला रोमॅण्टिक सीन. 'प्यार हुआ, इकरार हुआ, प्यार से फिर क्यूँ लगता है डर...' पावसाच्या सरी अंगावर झेलत कपल्स नॅशनल पार्कच्या डांबरी रस्त्यावरुन चालू लागतात. छत्री पावसासाठी नसतेच, तिचा उपयोग आडोशासाठीच. तिने डोक्यावरुन ओढणी लपेटायची. मग पावसाचा जोर वाढतो आणि... आणि... अलगद त्याचा हात तिच्या खांद्यावर विसावतो. दोघेही शहारतात... त्यांच्यासारखेच दोन-चारजण पुढेमागे चालत असतात. कुणी झाडाच्या आडोशाने, कुणी ओढ्याच्या काठी विसावलेलंं. एव्हाना पावसाने सर्वांग भिजलेलं असतं. पण छत्री काही बंद होत नाही. थंडीने अंग थरथरु लागतं, पण एकमेकांच्या सहवासाची ऊब तरारी देते.
नॅशनल पार्कमध्ये मनसोक्त फिरता येतं, भटकता येतं. अगदी कुठंही. प्रायव्हसीच्या शोधात असलेल्यांना ती पावलापावलावर सापडते. इथं यायचं म्हणजे एक फायदा असतो. कुणीही ओळखीचं सहसा भेटत नाही आणि चुकूनमाकून भेटलं तरी कुणी कुणाला काही सांगत नाही. सब पंछी एक डाल के..! नॅशनल पार्कचं प्रत्येक झाडं, प्रत्येक बेंच, प्रत्येक वाट अन् अगदी प्रत्येक दगड हा प्रेमाचा साक्षीदार असतो. अनेक कपल्सची बसायची जागाही ठरलेली असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी मज्जेत वेळ जातो. दुपारी पोटात कावळे काव काव करतात. मग जी हुश्शार असते, ती पर्समधून वेफर्स, कुरकुरे, फरसाण, चिक्की नाहीतर चॉकलेट्स बाहेर काढते. छोटीशी पाण्याची बाटली असतेच. पोरगी गृहकृत्यदक्ष की काय म्हणतात, ती आहे की नाही, याची वधूपरीक्षाही तिथे आपसूक होऊन जाते.
नॅशनल पार्कातला एक रस्ता वनराणी आणि गांधी टोपीकडे जातो. दुसरा रस्ता टायगर सफारीकडे. त्याच बाजूला थोडा पुढे धबधबाही आहे. आणि तिसरा रस्ता कान्हेरी गुंफाकडे जातो. हे तीन स्पॉट म्हणजे खरं तर प्रेमाच्या फुटपट्ट्याच. म्हणजे कसं..? अगदी नवखी कपल्स वनराणी-गांधी टोपीकडे जातात. हा मार्ग एकदम सेफ. थोडी सरावलेली कपल्स टायगर सफारीच्या मागच्या अंगाच्या रस्त्याने धबधब्यापर्यंत पोहोचतात. कुणी पोहोचतच नाहीत, आडवाटेतच त्यांची पावलं अडखळतात. आणि एकदम मुरलेली कपल्स कान्हेरी गुंफाची वाट वाकडी करतात. स्वत:ची बाइक असेल, तर फक्त आणि फक्त कान्हेरी गुंफाच. नॅशनल पार्कमध्ये बाइक असणाऱ्यांना अॅडव्हाण्टेज असतो. वाट्टेल तिथे बाइक थांबवली, मेन स्टॅण्डला लावली की झालं. वाटलं तर बाइकवर, नाहीतर पायवाटेनं झाडाझुडपाच्या आड. बाइक बंद, रोमान्स सुरू... अगदी तासा-दीड तासाची पायपीट करुन कान्हेरी गुंफाची टेकडी गाठणारी साहसी कपल्सही अनेक असतात. या टेकडीवर पोहोचल्यानंतर आपण जणू जंगलाच्या हिरव्या गालिचावर उभे असल्याचा भास होतो. आवडीचं माणूस सोबत असलं की, कान्हेरीचा रस्ता कधी संपतो कळतच नाही. चिंब पावसानं रान आबादानी झालेलं. अशा धुंद हिरव्या रानातली रिमझिम पावसातली ही वारी एकदा तरी अनुभवण्याजोगी.
पावसाळ्यातली नॅशनल पार्कची सफारी हा स्वर्ग असेल, तर बाकीच्या मोसमात स्वर्ग फक्त दोन बोटं उरलेला असतो. ऋतू कुठलाही असो, इथं प्रेमाला आणि प्रेमिकांना सदैव पालवी फुटलेली असते. पण या स्वर्गाच्या वाटेवर काटेही आहेत बरं... विशेषत: अंधार पडल्यानंतर हे जंगल खूपच धोकादायक आहे. अगदी दिवसाढवळ्याही बिबट्यांपेक्षाही हिंस्त्र अशा मानवी पशूंचा इथे मुक्त संचार असतो. जंगल में मंगल करायला आलेल्या प्रेमी कपल्सना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुबाडण्याचे प्रकार सर्रास घडतात. प्रसंगी अब्रूवर आणि जीवावर बेतल्याचीही उदाहरणं आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या कपल्सनी सातच्या आत घरात हा नियम गाठीशी बांधूनच ठेवावा.
'प्यार किया है, तो इतना डरनाही पडेगा...'

Monday, August 10, 2009
७० mm प्रेम
सिनेमा हॉलच्या अंधारात प्रेमी कपल्स प्रायव्हसी शोधायला सुरुवात करतात. पडद्यावर रणबीर कपूर टॉवेलमध्ये नाचत असतो आणि समोर प्रेमी कपल्सचं कुची कुची रकमा... सुरू असतं. केवळ तेवढ्यासाठीच तर कॉर्नर सीटचे पैसे मोजलेले असतात.
सिनेमावाल्यांचा संप मिटला. नाही म्हणजे त्याचा आनंद आहेच. पण एक कम्युनिटी मात्र नक्कीच खट्टू झाली असेल, लव्ह बर्डसची!
आता का म्हणून काय विचारता... गेले दोन महिने सिनेमा थिएटरमध्ये एकही नवा पिक्चर लागला नव्हता. त्यामुळे सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये हाऊस फुल्लची बोंबच होती. बॉलिवूडमधील मंदीच्या या काळात खरीखुरी मज्जा झाली, ती या लव्ह बर्डसचीच. कोणत्याही शोला जा, थिएटरचं वाळवंट झालेलं... मग तिथं फुलायचं प्रीतीचं ओअॅसिस!
सिनेमा आणि लव्हर्सचं नातं म्हणजे कसं, एक दुजे के लिए... सारखं. प्रेमावर सिनेमा निघतात आणि सिनेमा बघून लोक प्रेमात पडतात. त्यामुळे सिनेमा हॉलसारखा दुसरा लव्हर्स स्पॉट शोधूनही सापडणार नाही. उन्हातान्हात, पावसापाण्यात, थंडीवाऱ्यात, उघड्या पार्कामध्ये किंवा समुदकिनारी वणवण भटकण्यापेक्षा कूल कूल एसीमध्ये बसून तीन तासांचा सिनेमा पाहणं कधीही बेस्ट. रस्त्यावरुन फिरायचं म्हणजे कुणीतरी पाहील याची भीती. त्यापेक्षा सिनेमा थिएटरमध्ये प्रोजेक्टरच्या मंद मंद उजेडात कसं मस्त मस्त.
प्रेमात पडल्यानंतर आपण सर्वात आधी काय करतो तर एकत्र सिनेमाला जातो. घरापासून लांबच्या थिएटरमध्ये. सोबतीला गर्लफ्रेण्ड असतेच. पण तिनेही सोबतीला आपली छोटी बहीण किंवा शेजारच्या मुलीला आणलेलं असतं. आपण जाईपर्यंत दहा मिनिटांचा पिक्चर गेलेला असतो. श्शी, उशीर झाला ना, असं तिला वाटतं. आपल्याला अजिबात काही वाटत नाही. अंधारात एक एक खुर्ची ओलांडत आपली सीट गाठायची कसरत रोमांचकारी असते. हलकेच आपला स्पर्श तिला होतो. लाइफमधला पहिलावाहिला स्पर्श... अगदी 'काँटा लगा' की काय म्हणतात, तस्सं होऊन जातं. सिनेमा बघताना आपण गप्प असतो, पण स्पर्शाच्या भाषेत बरंच काही बोलून जातो. खरंय ना?
हा झाला सिनेमाचा इण्टरव्हलपर्यंतचा भाग. लेकिन पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त...
हळूहळू सिनेमा थिएटरच्या चकरा वाढतात. सिनेमा हॉलच्या अंधारात प्रायव्हसी शोधायला सुरुवात होते. पडद्यावर रणबीर कपूर टॉवेलमध्ये नाचत असतो आणि खाली प्रेमी कपल्सचं कुची कुची रकमा सुरू असतं. केवळ तेवढ्यासाठीच तर कॉर्नर सीटचे पैसे मोजलेले असतात. कधी कधी प्रेमकैदी एवढे आवारा, पागल, दिवाने होतात की बाजूला फॅमिली किंवा छोटी मुलं आहेत, याचंही भान राहत नाही. प्रेमाची गाडी ओव्हरस्पीडमध्ये धावत असते. लज्जा, संकोच, भीतीची स्टेशनं केव्हाचीच मागे गेलेली असतात.
खरं तर अशा बेधुंद प्रेमींसाठीच अनेक मल्टिप्लेक्सेसमध्ये मऊ मऊ कोचाची सोय उपलब्ध आहे. एकदम फन रिपब्लिक... फ्लॉप, टुकार चित्रपट किंवा मराठी चित्रपटांचे मॉर्निंग शो म्हणजे प्यार में पागल लोकांसाठी स्वर्गच... काही बोटांवरच तर हा स्वर्ग असतो. मराठा मंदीरसारख्या थिएटरमधील 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा ७०० वा विक्रमी आठवडा. आतमध्ये जावं तर सगळ्या खुर्च्या रिकाम्या. कोपरे कोपरे शोधून कपल्सनी आपापलं विश्व तयार केलेलं... पडद्यावरच्या बिचा-या काजोलकडे ढुंकूनही कुणी पाहत नाही. सगळे दिलवाले आपापल्या दुल्हनियाच्या दुनियेत... ना मंदीचं टेन्शन, ना बॉसची कटकट, ना उज्ज्वल भविष्याची चिंता. फक्त टिंग निंग निंग निंग... टिंग निंग टिंग निंग...
परंतु कधी कधी सिनेमा थिएटरमध्ये सॉलिड गोचीही होते. म्हणजे आपण चंमत ग करण्यासाठी जातो आणि आपलीच चकट फू चंमत ग होते. कॉलेजचं लेक्चर बंक करून आलेल्या टोळक्याच्या तावडीत आपण अलगद सापडतो किंवा ऐनवेळी टाइमपास म्हणून साध्या थिएटरमध्ये जातो आणि आधीच टाइमपास करण्यासाठी आलेल्या कुणाच्या तरी जाळ्यात अडकतो. त्यामुळे आवडीच्या माणसासोबत पिक्चरला जाताना सुरक्षितता हा फॅक्टर लक्षात घेऊनच थिएटरची निवड करावी लागते. नाहीतर फुकटचा मनस्ताप होतो.
सिनेमा थिएटरच्या पायऱ्या चढत चढतच आपल्यापैकी अनेकजण लग्नाच्या बोहल्यावर चढतात. सिनेमासारखाच प्रेमी कपल्सच्या आयुष्याच्या पिक्चरचा शेवटही बहुतांशी गोड होतो.
... आणि ज्यांचा होत नाही, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोतच.

Saturday, August 8, 2009
क्युपिड पार्क!
बच्चे कंपनीसाठी बालोद्यान असतं, आजी-आजोबांसाठी नाना-नानी पार्क असतं, तसं युथ जनरेशनसाठी एखादं क्युपिड पार्क का नको? जिथे फक्त आणि फक्त प्रेमाचंच अधिराज्य असेल...
'जे लाहोर नही देख्या, ते नहीं जन्म्या...' अशी पंजाबी म्हण आहे. अगदी त्याच तालावर जिसने शिवाजी पार्क नही देख्या, वो लव्हरच नही... असं विधान आपण करू शकतो.
शिवाजी पार्कात एकदाही पाय ठेवला नाही, असा मुंबईकर आशिक शोधून सापडणार नाही. जशी क्रिकेटची, तशीच शिवाजी पार्क म्हणजे प्रेमाचीही पंढरी. दिवसाचे २४ तास, विशेषत: सूर्य मावळल्यानंतर इथे प्रेमाचा ऊरुसच भरलेला असतो. पार्कातील हिरवळ, कट्टा, ज्ञानेश्वर गार्डन ते अगदी अरबी समुदाच्या काठापर्यंत प्रेमरसात आकंठ बुडालेले प्रेमवीर पावलापावलावर भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दादरसारख्या मध्यवतीर् भागात पाय रोवून उभं असलेलं हे ऐतिहासिक मैदान. ते प्रसिद्ध आहे, इथे भरणाऱ्या लाखो-लाखोंच्या राजकीय सभांसाठी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्यातील भाषणांनी आणि सचिन तेंडुलकरने आपल्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने शिवाजी पार्क गाजवलं. तेच मैदान यच्चयावत प्रेमी कपल्ससाठी हक्काचं व्यासपीठ बनलंय... क्युपिड पार्क.
सकाळचा सूर्य उगवण्याआधीच प्रेमाची पाखरं इथं किलबिलाट करू लागतात. सकाळी जॉगिंगला आलेल्यांएवढीच प्रितीच्या फुलपाखरांची गदीर् कट्ट्यावर दाटलेली असते. कॉलेजचं लेक्चर बंक करून आलेली तरुण कपल्स इथे दुसऱ्याच अभ्यासाला भिडलेली असतात. उन्हं डोक्यावर येतात तशी गदीर् वाढायला लागते. संध्याकाळी पार्कात जत्राच भरलेली असते. कट्ट्यावर शोधूनही जागा सापडत नाही. बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांचा कट्टा ठरलेला असतो. त्यांच्या जागेवर आपण बसलो तर नको नको ते टोमणे ऐकावे लागतात. अशावेळी प्रेमी कपल्सना आधार देते ती मैदानातील हिरवळ.
दादर स्टेशन, प्लाझा, शिवाजी मंदीर, शिवसेना भवन, जिप्सी, माँसाहेबांचा पुतळा... या जागा म्हणजे कपल्सचे मीटिंग पॉइण्ट्स. सूर्य मावळतीला डोकावू लागला की, प्रेमी कपल्सची पावलं चालती पार्काची वाट अशी अवस्था होऊन जाते. जोडीदाराचा हात धरुन आधी उद्यान गणेशाचं दर्शन घ्यायचं... बाप्पाचा प्रसाद मिळाला की, पार्कात हिरवळीवर मोक्याची जागा पकडायची. क्रिकेटच्या पीचची चहुबाजूंनी नेट लावलेली जागा म्हणजे सोने पे सुहागा... एव्हाना पार्कात अंधाराचं राज्य पसरलेलं असतं. ज्या पीचवर दिवसा क्रिकेटची नेट प्रॅक्टिस चालते, तिथे वेगळीच प्रॅक्टिस रंगलेली असते. रात्रीस खेळ चाले... असं मस्त भारलेेलं वातावरण इथे असतं. अवघ्या पार्कावर क्युपिडचं (अर्थात प्रेमदेवतेचं) अधिराज्य सुरू झालेलं असतं. रात्री दहा-साडे दहा वाजेपर्यंत ही नाइट मॅच संपते आणि सभ्य प्रेमी कपल्स आम्ही त्या गावचेच नाही, अशा आविर्भावात आल्या वाटेने माघारी परततात. परंतु रात्री अकरानंतर पार्कात जे काही सुरू असतं, त्याची इथे वाच्यताच न केलेली बरी. चंपी, मालिशपासून ते कुणाही सुसंस्कृत माणसाच्या अंगावर काटा येईल, असे अश्लील आणि बिभत्स प्रकार तिथे चालतात.
कल्पना करा की, उद्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय... चित्रपटाचा सिक्वल म्हणून कुणी मी शिवाजीराजे भोसले पाहतोय... असा चित्रपट काढला तर?
हाच खेळ चौपाटीवरही अहोरात्र चाललेला असतो. महापौर बंगल्यापासून कीतीर् कॉलेजपर्यंत पसरलेली किनाऱ्याची भिंत. या भिंतीला खेटून दुपट्ट्याच्या आड, छत्रीचा आडोसा घेऊन, प्रेमाच्या नावाखाली अगदी किळसवाणे चाळे सुरू असतात. समुदाला भरती असो नाहीतर ओहोटी, किनाऱ्यावर बसलेल्या या जोडप्यांच्या प्रणयाला (?) मात्र कायम उधाण असतं. त्यांच्या या साधनेत भिकारी, तृतीयपंथी आणि आंबट शौकिन पोरांचा कायम उपदव सुरू असतो. त्यामुळे सच्चा प्रेमीजनांनी चौपाटीचं दर्शन थोडं लांबूनच घेतलेलं बरं!
या कपल्सना असं उघड्यावर पडलेलं पाहिलं की वाटतं, या मुंबईत मनसोक्त प्रेम करण्यासाठी एखादी जागा हवीच. बच्चे कंपनीसाठी बालोद्यान, आजी-आजोबांसाठी नाना-नानी पार्क असतं, तसं युथ जनरेशनसाठी एखादं क्युपिड पार्क का नको? विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत... सो पॉलिटिशियन्स, थिंक अबाऊट इट.

Thursday, August 6, 2009
बेस्ट स्टॉप... बेस्ट स्पॉट
मुंबईतील बेस्टची सेवा खरोखरच बेस्ट आहे. मग तो रस्त्यावरचा स्टॉप असो, नाही तर धावणारी बस. प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठी आतुरलेल्या कपल्ससाठी या जागा म्हणजे हॉट स्पॉटच...
एखादा आडोशाचा स्टॉप शोधायचा... चांगली शेड, चार-दोन झाडांची सावली असलेला. बसेसची फ्रिक्वेन्सीही कमी असणारा. महत्त्वाचं म्हणजे दोघांच्याही घरापासून ब-यापैकी लांबच्या अंतरावरचा... शोधणाऱ्यांना असा स्टॉप सापडणं फारसं मुश्किल नाही. रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी नरिमन पॉइण्ट, सीएसटी, कुलाबा परिसरात फेरफटका मारला तर पावलापावलावर अशा जागा सापडतील. दोन तास, तीन तास कितीही वेळ बसा तिथे. तुम्हाला साधं कुणी हटकणारही नाही. पार्काबिर्कात त्रास देणारे भिकारी, फेरीवाले, छक्के यापैकीही कुणी इथे येत नाही. तुम्ही आणि तुमचं माणूस फक्त.
एकाच जागी उभे राहून कंटाळा आला तर जी कुठली पुढची बस येईल, ती पकडायची. शक्यतो डबल डेकर, गदीर्ची वेळ टाळून. दुपारी किंवा सुट्टीच्या दिवशी बेस्टचा वरचा मजला रिकामाच असतो. दोन लास्ट स्टॉप सांगितलं की, कण्डक्टरही काय समजायचं ते समजून जातो. यंग कण्डक्टर असेल तर ठीक आहे, पण कुणी बुढ्ढाचार्य असेल तर जरा सांभाळून. कारण पिकलं पान तिकीट फाडता फाडता एखादा टोमणाही चिकटवतो. पण त्याकडे न चुकता कानाडोळा करायचा. काही प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न कराल तर फसाल. कण्डक्टरच नाही, बसमधले बाकीचेही तुम्हाला गिऱ्हाईक बनवतील.
साधी बस असेल, तर मागची सीट आणि डबल डेकर असेल तर वरच्या मजल्यावरची पुढची सीट अजिबात विसरायचं नाही हे. या सीटवर आरक्षित अशी पाटी लावलेली नसते. परंतु प्रेमी कपल्सनी आपल्या कर्तृत्त्वाने हे आरक्षण पदरात पाडून घेतलं आहे, याचा विसर पडू देऊ नका.
बेस्टची एसी सेवा म्हणजे कपल्ससाठी स्वर्गच... काळ्या काचांच्या, पडदे असलेल्या ए १ किंवा ए २ या गारेगार एसी बसेसमधून प्रिय व्यक्तीसोबत फिरण्याचा आनंद काही औरच आहे. तो शब्दांत वर्णन करताच येणार नाही. ज्या कुणा बेस्टच्या अधिकाऱ्याला ही कल्पना सुचली त्याला आमच्याकडून जादू की झप्पी... पण चांगल्याला चांगलं म्हणायची सोय नाही. कारण हल्ली बेस्टने किंगलाँगच्या नव्या एसी बसगाड्या रस्त्यावर आणल्या. एकदम पारदर्शक, निळसर काचांची ही बस दुदैर्वाने आपल्या कामाची नाही!
मुलीला प्रपोज करण्यासाठी आपण नेहमी चांगलं स्थळं आणि वेळ निवडतो. आपल्या एका मित्राने अशाच बेस्ट वारीमध्ये एकीला प्रपोज केलं होतं. तुम्हीही असं काही धाडस करणार असाल तर जरा जपून. कारण चुकूनमाकून पोरीने नकार दिला आणि बोंब केली, तर तुमची काही खैर नाही.
तेव्हा बेस्ट प्रेमासाठी बेस्टच, पण प्रपोज करणार असाल तर... अॅट युअर ओन रिस्क!

गर्दीतला एकांत
गरज ही शोधाची जननी आहे, हे खरंच. त्या अर्थाने आम्ही मुंबईकर म्हणजे सगळ्या शोधांचे बापच...
साधं प्रेमाचंच घ्या... प्रेमात सगळेच पडतात. शंभरापैकी ९५ तर नक्कीच! आता या गजबजलेल्या मुंबईत प्रेमासाठी निवांत जागा शोधणं म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, ते प्रेमात पडल्याशिवाय कळणार नाही. (काय पटलं ना?) पण त्यावरही आपण उपाय शोधतो. खरं तर हा उपाय नसतोच, ती असते अॅडजस्टमेण्ट.
त्याशिवाय का दादरचं रेल्वे स्टेशन हा प्रेमी कपल्सचा हक्काचा अड्डा बनतो? दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस तुडुंब गदीर्ने ओसंडून वाहणाऱ्या या रेल्वे स्टेशनातही प्रेमाच्या कळ्या फुलतात. आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. फक्त लोकल पकडण्याच्या धावपळीच्या शेड्युलमधून फुरसतीची पाच मिनिटं काढायला हवीत. मग, प्लॅटफॉर्मवर फुललेले प्रेमाचे गुच्छच गुच्छ नजरेला पडतात.
दादर वेस्टर्नचा प्लॅटफॉर्म नंबर एक. तिथला इण्डिकेटर... ज्युस आणि आइस्क्रिमवाल्याचा स्टॉल. तुम्ही कधीही जा, चार-दोन कपल्स तिथे आवर्जून भेटतात. चूकामूक न होता हमखास भेटण्याची ही सोयीची जागा. सेण्ट्रल आणि वेस्टर्नला जोडणारे दोन्ही पूल इथे रिकामे होतात. त्यामुळे भेटायचं असेल तर यासारखी दुसरी सोयीची जागा नाही. तुम्ही उपनगरात राहता की शहरात, वेस्टर्नने येता की सेण्ट्रलने... या ठिकाणी हृदयांची भेट होतेच. लोकल पकडणाऱ्यांची गदीर् इथे असतेच. पण आपल्या प्रियकर, प्रेयसीची वाट पाहणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. हे ठिकाण सोयीचं अशासाठी की, इथून शिवाजी पार्क, चौपाटी, सिद्धिविनायक मंदीर, प्लाझा, शिवाजी मंदीर, प्रभादेवी, वरळी सी फेस असं कुठेही सहज जाता येतं.
रेल्वे स्टेशनवर भेटण्याचे बरेच फायदेही असतात. एक तर गदीर्त कुणी ओळखीचा भेटलाच तर तो स्वत:च घाईत असल्यामुळे आपल्याला टोकणं जरा कमीच. दुसरं म्हणजे ओळखीचा कुणी दिसला तर कलटी मारणं सोप्पं असतं. बोलता बोलता दोन-चार पावलं पुढंमागं व्हायचं. आपल्यासोबत कुणी आहे, याचा दुसऱ्या कुणाला संशयही येत नाही. हाय-हॅलो झालं की तो-ती आपल्या वाटेने निघून जातात. आपण पुन्हा आपल्या प्रेमाच्या जगात परततो.
सेण्ट्रल आणि वेस्टर्नला जोडणाऱ्या मुख्य पुलावर उभं रहायलाही जागा नसते. त्याऐवजी त्याला समांतर असलेला जो छोटा पूल आहे, तिथे प्रेमाच्या गुजगोष्टी चांगल्या रंगतात. तिथेही कसला अडसर नसतो. जिथून दादर लोकल सुटतात, त्या प्लॅटफॉर्मलगतचा रस्ताही प्रेमी कपल्सनी गजबजलेला असतो. विशेषत: बाइकवरुन प्रेयसीला सोडायला आलेल्यांची इथे मोठी वर्दळ असते. तुमच्याकडे रेल्वेचा पास नसेल तरी काही हरकत नाही. वेस्टर्नला सुविधाचा फुटपाथ किंवा पूवेर्कडचं स्वामीनारायण मंदीर, हनुमान मंदीर हे स्पॉटही जणू प्रेमीजनांचीच वाट पाहत उभे असतात. टॅक्सीत बसून फाइव्ह गार्डनला जायचं नाही तर समोरच्या हॉटेलात बसून कोल्डड्रिंक प्यायचं. पूवीर् मामा काणेंचा बटाटावडा साक्षीला असायचा. आता त्याची जागा हॉटेलातल्या क्लब सॅण्डविचने घेतलीय. भरपूर वेळ असणाऱ्यांसाठी आणि नसणाऱ्यांसाठी असे वेगवेगळे ऑप्शन तयार असतात.
गर्दीतला हा एकांत अनुभवायला तरी एकदा दादर स्टेशनला याच...

Subscribe to:
Posts (Atom)